
बीड । निवेदक
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान मंगळवारी झाले व आता ही लोकशाहीची लढाई पुढच्या टप्प्याकडे चालू असून यामध्ये विविध प्रकारे उमेदवार आपला वचननामा घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यानुसारच बीड येथील अपक्ष उमेदवार शितल धोंडरे यांच्या मागे जनशक्ती एकवटली असून घराघरात जनतेच्या मनामनात त्यांनी यापुर्वी केलेले सामाजिक कार्य पोंहोचले असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून ऐकावयाला भेटत आहे. शितल धोंडरे यांची टीम गेल्या 8 दिवसांपासून बीड, केज, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव या ठिकाणी भेटी देवून मन परिवर्तन आणि मत परिवर्तन करण्याचा तसेच वाढती महागाई याबाबतचे मुद्दे जनसामान्यांना पटवून देत आहेत. शितल धोंडरे यांनी कोरोना काळात गरीबांसाठी केलेले काम या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांची प्रचाराची टीम ही सर्व गोष्टी ग्रामस्थांना समजावत आहे. सध्या गाव, वाडी,वस्ती, तांडा, शहरात, शितल धोंडरे यांची प्रचाराची टीम पोहोचली आहे त्यामुळे मतदारातही उत्साह वाढला आहे नको महायुती, नको महाविकास आघाडी असा सूर गाव, खेडे, शहरातील मतदारा मधून निघत आहे त्यामुळे शितल धोंडरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.