शिक्षक बांधवांवर अन्याय करणारी अधिसूचना रद्द करा मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे धरणे

बीड । निवेदक
सरकारने माध्यमिक शिक्षकांना वर्ग-2 मधून, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी या पदासाठी पदोन्नतीपासून वंचित ठेवले असल्याने आज जिल्हा परिषद कार्यालय बीड समोर माध्यमिक शाळेच्या शिक्षकांचे धरणे आंदोलन 2 जुलै मंगळवार रोजी धरणे आंदोलन केले आहे.
या आंदोलनाचा मुख्य हेतू असा की, राज्य शासनाने दि.28 डिसेंबर 2022 रोजी अधिसूचना काढत माध्यमिक शिक्षकांना वर्ग-2 मधून वंचित ठेवून त्यांना शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी या पदासाठी पदोन्नती मिळणार नाही अशी अधिसूचना काढली आहे. तरी जि.प.माध्यमिक शिक्षकांच्या वर्ग-2 पदोन्नतीमध्ये अडसर ठरणार्‍या शालेय शिक्षण विभागाने काढलेली दि.28.12.2022 रोजीची अधिसूचना रद्द करुन सेवा प्रवेश नियम 1978 प्रमाणे राजपत्रित मोकळा करावा अशी मागणी सर्व शिक्षक बांधवांची आहे.
तरी या आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे राज्याध्यक्ष व्हि.पी. फुलातंबकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत विना अन्न-पाणी घेता उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर सावंत, लाड कांतीलाल, श्री.कोंडजकर, श्री.खतीब सर, श्री.शहाणे, श्री.देशमुख, श्री.सवासे यांनी दिला आहे.

Leave a comment