
बाजीरावचे काय चुकले
समाज ऐक्यासाठी कार्यक्रम घेणे की सर्व समाजातील बांधवांना सोबत घेवून चालणे
बीड । निवेदक
परळीत गेल्या रविवारी ब्राह्मण ऐक्य परिषदेचा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. या कार्यक्रमाचे त्यांनी यथायोग्य नियोजन लावून ब्राह्मण समाज बांधव एकत्र येण्यासाठी प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात ब्राह्मण समाजाच्या मागण्या सरकारी दरबारी मांडणे हेच एकमेव कारण होते. बाजीराव धर्माधिकारी म्हणजे परळीमध्ये माजी नगराध्यक्ष राहिलेले नाव ते सर्व समाजातील बांधवांना कायम सोबत घेवून चालत आलेले आहेत मग केतकी चितळे हिच्याकडून अॅट्रॉसिटीबद्दल वक्तव्य झालेले असतांना निशाना बाजीराववर कशामुळे ? म्हणजे शब्द एकाचे आणि त्रास मात्र दुसर्यालाच म्हणजे अती झाले गावचे, पोट फुगले देवाचे असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
बाजीराव धर्माधिकारी हे नाव परळीमध्ये माजी नगराध्यक्ष तसेच सामाजिक कार्यात कधीही अग्रेसर असलेले नाव त्यांनी कधीही जातीभेद न करता सर्व समाजासाठी नगराध्यक्ष असतांना कामे केलेली आहे परंतू कोणतेही चांगले काम करत असलेल्या माणसाच्या वाट्याला अडचणी येतात हे आजचे नाही म्हणजे
जयाअंगी मोठे पण त्यासी यातना कठीण ।
असे अभंगामध्ये म्हणले आहे .
बाजीराव यांनी केवळ ब्राह्मण समाजासाठी नाही तर या अगोदर सर्व समाजासाठी देखील नगराध्यक्ष पदावर असतांना वेगवेगळे महत्वाचे कामे केलेली आहेत. मग निशाना बाजीराव यांच्यावरच का? तर समाज एक होण्यासाठी कार्यक्रम घेतला म्हणून की मुद्दामहून समाज नेतृत्वाला बदनाम करावयाचे आहे म्हणून बाजीराव टार्गेट केल्या जात आहेत अशी चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.
परळीमध्ये बाजीराव यांच्या समर्थनार्थ ब्राह्मण समाजाने निवेदन देखील दिले आहे की, बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर तेथे आलेल्या सर्व बांधवांवारच गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
अलीकडे प्रत्येक व्यक्तीलाच जातीच्या नजरेतून बघण्याचे प्रमाण सर्रास वाढले आहे यांना एवढे सांगणे की
रोने की वजह ना थी; ना हंसने का बहाना था; क्यों हो गए हम इतने बड़े; इससे अच्छा तो वो बचपन का ज़माना था।
कारण लहानपणी मित्र-मैत्रीणी या वेगळ्या जातीच्या असतात वेगवेगळे असतात हे माहितच नव्हते त्यांच्यासोबत डब्बे खाल्ले, एकत्र खेळलो, एकत्र अभ्यास केला तेच दिवस किती सुंदर होते. कोणाला माहित मोठा झाल्यावर जाती-पातीमध्ये वाटले जाणार आहोत आणि एखाद्याच जातीला जास्तीचे टार्गेट केले जाणार.