वेलडन जिल्हा वाहतुक : पोलीसचोरीचे वाहन 24 तासाच्या आत सापडून दिले

आरोपीला केले शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन

बीड (प्रतिनिधी)- शहरात सद्यस्थितीला पोलीस अधिक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या सहकार्याने सध्या वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर पोलीसांनी चांगलीच कार्यवाही सुरु केली असून गेल्या आठवड्यातच 200 रिक्षाचालकांवर दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही केली होती त्यामुळे रिक्षाचालकांना देखील वाहतुकीच्या नियम मोडल्यामुळे तसेच कागदपत्रे नसल्याने कार्यवाहीचा चांगलाच दणका बसला होता.दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी विशाल संजय कुलकर्णी (रा.आदित्य नगर, बीड) यांची मोटारसायकल 24 तासाच्या आत सापडून देण्याची उल्लेखनिय कामगिरी जिल्हा वाहतुक शाखेने केली आहे त्यामुळे नागरिकांत पोलीसांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी विशाल संजय कुलकर्णी (रा.आदित्य नगरी, बीड) यांची मोटारसायकल काल शनिवार रोजी अज्ञात चोराने चोरुन नेली होती ती मोटारसायकल जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, वसुदेव मिसाळ, बजरंग कुटुंबरे, सोबत पोलीस हवालदार राजाभाऊ तांदळे, महिला पोलीस शिपाई अनिता पवार, पोलीस हवालदार नितीन शिंदे, विष्णु काकडे, पोलीस नाईक अजिनाथ मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख व चालक पोलीस हवालदार हरके यांच्या टीमने शहरातील साठे चौकात वाहतुक नियमांचे उल्लंघन करत असतांना सदरील संशयित मोटारचालक सुनिल गणपत शिंदे (रा.वासनवाडी) यास पोलीसांनी पकडले व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत असतांना डिवायएसवर मुळ मालक यांचा मोबाईल नंबर मिळाला त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की कालच माझे वाहन चोरीला गेले याबाबत मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे त्यानंतर सदरील वाहतुक शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी चोरीची पडताळणी करत पुष्टी केली व आरोपीस पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांच्या ताब्यात दिले. यामुळे वाहन चोरी करणार्‍या आरोपींचे चांगलेच धाबे दणाणले असून नागरिकांतून पोलीसांविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a comment