विना कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन, फॅन्सी नंबर, विमा नसणार्‍या रिक्षाचालकांवर पोलीस अधिक्षकांच्या सांगण्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, उपनिरीक्षक जाधवर यांची कारवाई

बीड (प्रतिनिधी)-विना कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन, फॅन्सी नंबर, विमा नसणार्‍या रिक्षाचालकांवर पोलीस अधिक्षकांच्या सांगण्यावरुन पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी व त्यांच्या टीमने कारवाई केल्याने अनियमितता असलेल्या जवळपास 200 रिक्षाचालकांवर काल चांगलाच जरब बसल्याचे पहायला मिळाले तसेच ठोऽऽ ठो आवाज करणार्‍या बुलेट चालकांचे सायलेन्सर देखील काढण्यात आले व त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सुभाष सानप, फौजदार विजय जाधवर, बजरंग कुटुंबरे, वसुदेव मिसाळ पोलीस हवालदार श्रीकांत पाखरे, आजिनाथ बांगर, दत्तात्रय उबाळे, राजभाऊ तांबे राजाभाऊ तांदळे, पोलीस नाईक सचिन सारणीकर, आजिनाथ मुंडे, पोलीस हवालदार नितीन शिंदे पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख, गोरे, महिला अमलदार अनिता पवार, पोलीस ड्रायव्हर हवालदार हारके, पवार इत्यादी अंमलदार यांनी साठे चौक, शिवाजी चौक, सुभाष रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील जवळजवळ दोनशे रिक्षा, शहर पोलीस स्टेशन येथे, विना कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन, फॅन्सी नंबर, विमा नसणे. या सदराखाली लावण्यात आलेल्या आहेत. या निमित्ताने शहरातील सर्व रिक्षा चालकांनी आपल्याकडे रिक्षाचे मालकी हक्काचे कागदपत्र जवळ ठेवावीत व वाहतुकीचे नियम पाळावेत रस्त्यावर वाहने उभी करु नयेत असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी केले आहे.

Leave a comment