अण्णाभाऊंनी फक्त विशिष्ट जातीपुरते लिखाण न करता ,जे जे अन्याय अत्याचाराखाली जीवन जगत आहेत त्यांच्या व्यथा व वेदना आपल्या साहित्यातून जगासमोर मांडल्या. त्यांचे साहित्य म्हणजे वास्तवाचे दर्शन घडवणारे साहित्य होय. त्यांनी सुरुवातीला पोवाडे व शाहिरी तून बहुजनांचे प्रबोधन केले. त्यांच्या साहित्यसंग्रहात 35 कादंबऱ्या, 14 कथा संग्रह,14 लोकनाट्य, 11 पोवाडे, नाटक व प्रवास वर्णन यांचा समावेश होतो.
साहित्यातील हिमालयाचे शिखरे पादाक्रांत करणाऱ्या या साहित्यसम्राटाची 104 वी जयंती साजरी होत आहे. यांचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या खेड्यात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग जातीमध्ये झाला. त्यांच्या वडीलाचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. त्यांचे पाळण्यातले नाव तुकाराम होते. त्यांचे बालपण अतिशय हलाखीत गेले. वडीलाच्या नावावर फक्त वीस गुंठे जमीन होती. यामध्ये दोन महिने पुरेल एवढेच अन्न पिकत असे. त्यामुळे नेहमीच या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असे. स्वाभिमानाने व प्रामाणिकपणे जगणाऱ्या अण्णा भाऊंच्या वडिलांना आपले जीवन सुरक्षित वाटेना. त्यामुळे ते मुंबईला निघून गेले. व कुटुंबातील लहान भावंडांना संभाळण्याची जबाबदारी अण्णाभाऊ वरती आली. आणि त्यांचे शाळेकडे दुर्लक्ष झाले. अण्णाभाऊ 14 वर्षाच्या असताना, त्यांनी शाळेत जाणे चालू केले. शाळेचा दुसरा दिवस त्यांचा अखेरचा दिवस होऊन गेला. त्यावेळी जातीयता होती.दलितांच्या मुलांना वाईट वागणूक दिली जात असे. शाळेच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मास्तराची नजर त्यांच्या पाठीवर गेली नाही. व गेली त्यावेळी त्यांच्या पाठीवरती काहीच लिहिले नव्हते तेव्हा मास्तरांनी त्यांची बोटे फोडून काढली व या गोष्टीचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला त्यांनी कधीच शाळेचे तोंड बघितले नाही व अक्षराची ओळख आपल्या भावाकडून करून घेऊ अशा प्रतिकूल अवस्थेतून ही व्यक्ती साहित्यसम्राट म्हणून इतिहासात आपले नाव कायम करून ठेवते .हे एक आश्चर्यच मानावे लागेल .
बाल वयातच लग्न झालेला हा अल्पशिक्षित तरुण पोटापाण्याच्या विवेचनेत मुंबईतला गेला.काही काळ त्यांनी गिरणीत नोकरीही केली .तिथल्या साच्याच्या आवाजात त्यांना लोकसंगीताचा बाज दिसला. साम्यवादाच्या विचाराने उभा राहून त्यांनी ती नोकरी सोडली आणि कम्युनिस्ट पक्षात स्वतः झोकून दिले .चेंबूरच्या चिराग नगर झोपडपट्टी जेमतेम दहा बाय दहा च्या झोपडीत राहणारा आणि जग बदलू पाहणारा हा साहित्यिक कथा कादंबऱ्याचे लेखन करीत होता. हाती होता फक्त आत्मविश्वास आणि सकस अनुभव ओलअसणाऱ्या त्या टिचभर जागेत अण्णा भाऊंनी साहित्याचे विश्व निर्माण केले.त्यांच्या साहित्याची भाषा अस्सल ग्रामीण आहे. त्यांच्या कादंबऱ्यातील नायक अन्यायाविरुद्ध पेटून उठणाराआहे. पुरोगामी विचार घेऊन सभ्य जीवन जगण्यासाठी धडपड करणाराआहे . परंतु प्राप्त परिस्थिती त्याला जीवन जगू देत नाही. म्हणून तो परिस्थितीशी झगडतो. त्याच्या साहित्यात एका बाजूला शुरपणे लढणारा जगण्यासाठी धडपडणारा समाज असतो तर दुसऱ्या बाजूला शोषक अमानवी अत्याचार करणारा, क्रूर व व अमानुष समाज असतो. एकीकडे कष्ट करून पोटाची आग विझवण्याचा प्रयत्न करणारा गरीब माणूस असतो. दुसरीकडे शोषण करून आणलेली पापाची कमाई आपल्या तिजोरीत भरून ठेवणारा दह्या ,दुधाचे ढेकर देऊन पोटावर हात फिरवणारा विषम संस्कृतीचा भक्षक असतो. असल्याकारणाने.त्यांच्या साहित्याचा विषय बहुजन समातील कामगार,मजूर,कष्टकरी,हमाल, भिकारी, गुंड,दरोडेखोर यांच्या जीवनाशी निगडित अस होता. अज्ञान, अंधश्रध्दा,रूढी,परंपरा या मध्ये गुरफटून,दलित वर्ग आपले आयुष्य कसे उध्वस्त करून ठेवतों हे सारे अण्णाभाऊनी जवळून पाहिले असल्यामुळे त्यांनी त्याचे धग धगते जीवन आपल्या शाहिरीतून जगापुढे मांडले माणूस भुकेसाठी काय करू शकतो हे सांगताना ते म्हणतात
तो भुकेसाठी खोटे बोलु शकतो,तो भुकेकेसाठी चोरी करु शकतो दरोडे घालू शकतो,हे वास्तव अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा आणि कादंबऱ्या मधुन जगापुढे मांडले व जगाला त्याचे वास्तव दर्शन घडविले.पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन कष्टकऱ्याच्या, श्रमिकांच्या कामगारांच्या दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे अण्णाभाऊ छातीठोकपणे सांगतात व लोकापुठे वास्तव उभे करतात कल्पनारंजित कथा कांदाबऱ्या लिहिण्याचा प्रस्थापित मनुवादी साहित्यकारांनी पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे,असे लिहून बहुजनांना फसविले परंतु अण्णाभाऊंनी बहुजनापुढे वास्तव उभे करून त्यांचे प्रबोधन केले,
बहुजन समाजातील शेतकरी शेतात राबतो कष्ट करतो, मरमर करतो, देशाला खाऊ घालतो, देशाला जगवतो, स्वतः मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी उपाशी मरतो मोठ-मोठ्या इमारती बहुजन समाजातील मजूर उभा करतो त्या इमारती बांधनारा मंजूर मात्र छता विणा उघड्यावर पडलेला दिसतो. कापड गिरणीमध्ये कामगार कापड तयार करतो स्वतः मात्र कपड्याविना उघडाच राहतो.धोतराला सतरा गाठी बांधुन वावरतो हे वास्तव अण्णाभाऊंनी जीवनाच्या च्या प्रवासात पावलोपावली पाहीले असल्या कारणाने ते म्हणतात
“पृथ्वी” ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन ती श्रमिकांच्या,दलितांच्या कष्टकर्यांंच्या तळ हतावर तरलेली आहे।
हे अर्थात पृथ्वीचा अधार हा दलित कामगार मजूर आहे अण्णाभाऊनी तमाशाला लोकांनाट्यात रूपांतरित करून तमाशाची शान वाढवली त्यांची फकीरा ही कादंबरी जगात गाजली या काबंरीला १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचे पारितोषीक मिळाले होते, ही जग प्रसिध्द कादंबरी अण्णाभाऊनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्वलंत व झुंजार लेखणीस अर्पण केली. उपेक्षितांना कामगारांना कष्टकांना न्याय मिळून देण्यासाठी अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातुन आवाज उठविला व या व्यवस्थेतून मलाबदल घडवून आणावयाचा आहे, असे ते म्हणतात डॉ. बाबासाहेबांचे अपूर राहिलेल काम मला पूर्ण करावयाचे आहे ही तळमळ त्यांच्या ठिकाणी दिसते म्हणून ते म्हणतात
‘जग बदल घालूनी घाव,सांगुन गेले मज भीमराव।
एक जुटीच्या रथा वरती आरूढ होऊन चालबा पुढती।
मिळवून स्वातंत्र्य या जगती, कमवी निज गावं,
सांगून गेले मज भीमराव!
अण्णाभाऊचे साहित्य जगाच्या फ्रेंच व रशिया या देशा सहीत २७ देशात भाषांतरित झालेले आहे ऐवढी अपूर्व साहित्य निर्मीती अण्णांनी निर्माण केली होती त्यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ढवळून निधाली आणि डफावरिल थापेने महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि सरकारने अण्णाभाऊंना लोकशाहीर पदवीने गौरविले , उपेक्षित समाजात जीवन जगणाऱ्या स्त्री ला अण्णाभाऊंनी खंभीरपने साहित्यात आपली नाईका बनविली आहे. महीलांच्या संघर्षावर प्रकाश टाकणारी आबी नावाची कथा लिहली यातुनच स्त्रियाला कुठल्या व्यथांना सामारे जावे लागते यांचे वास्तव चित्रण साहित्याच्या माध्यमातुन जगापुढे आणले
जनसामान्यांचे प्रबोधन करणाऱ्या साहित्यिकाचे ऐन उमेदीच्या काळात १८ जुलै १९६९ ला निर्वाण झाले अशा अलौकिक व्यक्तिमत्वाच्या उपेक्षित वंचित, श्रमिक, कष्टकरी, शोषित यांच्या व्यथा व वेदना आपल्या साहित्यातून जगासमोर रेखाटणारे दबलेल्या पिचलेल्या समाजाचे दुःख जाणून अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवणारे जगदंविख्यात साहित्यिक साहित्यरत्न, साहित्यसम्राट, लोकशाहीर यांच्या 104 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
श्री.सुभाष लक्ष्मणराव मोरे( सहशिक्षक
श्री.विनायकराव माद्यमिक विद्यालय,ता.पाटोदा)