लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतनिमित्त ऊसतोड मजुरांना औषध-गोळ्या वाटप करुन मनसेकडून अभिवादन

बीड (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे भूमीपुत्र लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतनिमित्त ऊसतोड मजुरांना आरोग्यासाठी आवश्यक असणार्‍या गोळ्या औषध वाटप करून अनोखी जयंती बीड शहर म.न.से.ने साजरी केली आहे.
 ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात ऊसतोड मजुरांसाठी वेळोवेळी मदत केली,  त्यांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी लढा दिला त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त ऊसतोड मजुरांच्या वेदना थेट शेतात जाऊन जाणून घेत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गोळ्या औषधांचे वाटप करुन मुंडे साहेब यांना अभिवादन केले. यावेळी सदाशिव बिडवे – जिल्हा उपाध्यक्ष,सोमेश्वर कदम – जिल्हा सचिव, श्रीकृष्ण गायके  – तालुका अध्यक्ष, लालासाहेब ढाकणे  – तालुका सचिव,  दीपक पवार ,अविनाश पवार, रंजित पवार  (ऊसतोड कामगार) आदींची उपस्थिती होती.

Leave a comment