लाडेवडगावात अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्याला गर्दी

संत, कीर्तनकारांची उपस्थिती; ह.भ.प. संदिपान महाराज हासेगावकर यांचे कीर्तन

केज । लक्ष्यवेध प्रतिनिधी
दि.14 : तालुक्यातील होळ येथील भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, व्याकरणाचार्य ह.भ.प.अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्यानिमित्त अखंड रामकृष्णहरी नामजप यज्ञ सोहळ्याची सांगता लाडेवडगाव येथील वेदांत साधनास्थली गुरुकुल आश्रमावर मंगळवारी (दि. 14) झाली. यावेळी ज्ञानसिंधू ह.भ.प. संदिपान महाराज हासेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.
या सोहळ्यास स्वामी भारतानंद गिरी, नामदेव महाराज शास्त्री, महादेव महाराज चाकरवाडीकर, लक्ष्मण महाराज मेंगडे, आदिनाथ महाराज, मनिषानंद स्वामी, सोपान महाराज सानप, महारुद्र खाडे महाराज, प्रकाश महाराज साठे, नाना महाराज कदम, पांडुरंग महाराज मुंडे, डॉ.प्रल्हाद महाराज शास्त्री, आप्पा महाराज चौरे, अर्जुन महाराज लटपटे, पांडुरंग महाराज डोंगरेश्वर यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील माजी मंत्री पंडितराव दौंड, नंदकिशोर मुंदडा, रमेश आडसकर, काशीराम कराड, भाई ज्ञानोबा मुंडे, बन्सी सिरसट, संतोष हांगे, विष्णू घुले, हिंदूलाल काकडे, नेताजी शिंदे, सूर्यभान मुंडे, पिंटू ठोंबरे, सौरभ सोनवणे, भगवान केदार, दत्ता धस, अयोध्याताई केंद्रे आदी मान्यवरही उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह अनेकांनी अर्जुन महाराज लाड यांचे अभिष्टचिंतन करत सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाडेवडगाव व होळ ग्रामस्थांसह भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था, वेदांत साधनास्थली गुरुकुल आश्रमाचे आजी-माजी विद्यार्थी आणि भाविकांनी परिश्रम घेतले.
नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते अर्जुन महाराज लाड यांचा सत्कार
नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते अर्जुन महाराज लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अर्जुन महाराज लाड यांनी वेदांत साधनास्थली गुरुकुल आश्रम व भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून वारकरी संप्रदायात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आयुष्याची 61 वर्षे पूर्ण केली असून ते 34 अपघातांतून बचावले आहेत. यामागे पांडुरंगाची कृपा आहे. भगवानगडाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असून ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरानंतर पहिल्यांदाच भगवानगडावर मंदिर उभारण्यात येत आहे. त्या सोहळ्याचे निमंत्रणही याप्रसंगी देण्यात आले.
राज्यभरातून भाविकांची हजेरी
अर्जुन महाराज लाड यांचे अनुयायी, भाविक व विद्यार्थी राज्यभरात मोठ्या संख्येने आहेत. या सोहळ्यास भाविकांची लक्षणीय गर्दी होती. यावेळी मांडे जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. कार्यक्रमासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a comment