दिल्लीत हाताने कमळ नाही तर जनतेने केजरीवालांचा ‘झाडून’ पराभव केला

बीड(प्रतिनिधी)-दिल्ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत असलेल्या केजरीवाल यांचा आणि त्यांच्या आम आदमी पार्टीचा काल दारुन पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आम आदमी पार्टीच्या विरोधात मोठे नेते उतरविल्यामुळे हाताने कमळाला मदत केली असे राजकीय गणित मांडले जात आहे परंतू दिल्लीतील जनता मात्र केजरीवालांवर नाराज असल्याने ओव्हरऑल काम करत असलेल्या भाजपाला सहकार्य करुन विजय मिळवून देत आपचा झाडून पराभव करत आपच्या मोठ मोठ्या नेत्यांना देखील घराचा रस्ता दाखवल्याने राजधानी दिल्लीतून आप विक झाल्याचे चित्र देशवासियांना पहायला मिळाले आहे अन् राजकारण बदलायला निघालेल्या केजरीवालांना ‘राज’कारणानंच अर्थात जनतेसोबत राजकारण केल्यानेच बदलल असल्याचं बोललं जात आहे.
अण्णा हजारेंसोबत लोकपाल विधेयकाच्या आंदोलनाला बसून लोकांचा विश्वास जिंकत स्वतःचा पक्ष काढून सुरुवातीच्या निवडणुकीत जनतेने खंबीर पाठिंबा दिल्याने 48 दिवसाचे सरकार बनवत पत्रकारांसमोर समाज बदलावयाच्या गोष्टी करणार्या अरविंद केजरीवाल यांना काल समाजाने बदलल असल्याच चित्र देशभरात पहायला मिळालं. त्यामुळ प्रथम महिला मुख्यमंत्री पदाचा मान देणार्या भाजपाला केंद्रात सत्ता असतांना देखील केजरीवालांच्या फेक प्रचारामुळं 2 वेळा दिल्लीत 7 चे 7 ही खासदार असतांना देखील राज्याच्या सत्तेपासून दुर राहावे लागते.
परंतू यावेळी चित्र वेगळे होते दिल्लीच्या जनतेने काही वेगळेच ठरवले होते 5 फेब्रुवारी रोजी 60.44 टक्के मतदान करत मतदारांनी केजरीवालांना घरी बसवण्याचा निर्णयच पक्का केला होता त्यांच्या पश्चात मुख्यमंत्री असलेल्या आतिशी मालरेना यांना देखील काही विशेष असे काम करता आले नव्हते ज्याचा फायदा केजरीवालांना होईल अशा परिस्थितीमुळे राजकारण बदलायला निघालेल्या केजरीवालांना ‘राज’कारणानंच बदलल.
केजरीवालांनी पाहिजे तसे विकासकाम केलेले नाही त्यामुळे नागरिक त्यांच्यावर नाराज होते-देशमुख
10 वर्षात केजरीवालांना खुप चांगले काम करता आले असते परंतु तसे झाले नाही पाहिजे तसा बदल झाला नाही. याउलट भाजपाने चांगल काम केल्याच दिल्लीकरांना कळले होते. केजरीवाल हे मध्यमवर्गीयांसाठी पाहिजे तसे काहीही सहकार्य केले नाही. चांगल प्रशासन आणेल भ्रष्टाचारापासून दुर ठेवेल दिल्लीला या अपेक्षा होत्या परंतू तसे काहीच झालेले नाही.तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दिल्लीतील नागरिक त्यांच्यावर नाराज होते.
सत्येंद्र देशमुख, दिल्ली येथील नागरिक.