येवता येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बीड (प्रतिनिधी)- केज तालुक्यातील येवता येथे महामानव बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे लिंबराज गायकवाड, वचिष्ट साळवे, संजय गायकवाड, अमोल लांडगे, सचिन गायकवाड, श्रीकांत जाधव, किशोर गायकवाड, सतीश जाधव, संतोष जाधव, प्रथमेश गायकवाड यांची उपस्थिती होती.
अभिवादनाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे लिंबराज गायकवाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाची ओळख जगाला करुन दिली. आज संपुर्ण जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अभ्यास केला जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच जातीभेद, भेदभाव मागे पडून आज सक्षम भारत, सदृढ भारत बनत आहे त्यांच्या विचाराची देशाला, जगाला गरज आहे त्यामुळे सर्व तरुणांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच चालावे.

Leave a comment