बीड । निवेदक
तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडोबा महाराज देवस्थान येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी खंडोबा महाराजांच्या यात्रेचे आयोजन चंपाषष्टी (सट) दिनी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंदिरात घटस्थापना दि.13 डिसेंबर पासून दररोज संगीत गायन व जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू असून दि.17.12.2023 पर्यंत मंदिरात सार्वजनिक जागरण गोंधळ व महाआरती कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि.18 डिसेंबर रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व रात्री 8 वाजता गावातून पालखीची मिरवणूक होऊन 3 प्रदक्षणेचा कार्यक्रम होईल तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने रंजीत डावकर, दादासाहेब डावकर, अंकुशराव खाडे, वसंत डावकर, केशव डावकर, प्रताप डावकर प्रल्हाद डावकर, माणिक डावकर, राम खाडे, हरिश खाडे आदींसह ग्रामस्थांनी केले आहे.