राजेंद्र मस्के यांची फेसबुकवरील पोस्ट
बीड । निलेश पुराणिक
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज आपल्या फेसबुकवर मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे अशी पोस्ट करुन भाजपा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले राजेंद्र मस्के हे पंकजाताई मुंडे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू नेते आहेत परंतू निवडणुक लढवण्याचा मानस त्यांनी यावेळी केलेला असून त्यासाठी त्यांनी भाजपाचा सोडल्याची तयारी त्यांनी केली आहे.
तसेच मध्यंतरी त्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे बॅनरवर फोटो लावल्यामुळे तसेच दरवेळेस सावरगाव येथे दसरा मेळाव्याला जात असतांना यावेळी नारायणगड येथे दसरा मेळाव्याला गेल्याने वेगळ्याच चर्चा होत होत्या आता मात्र त्यांनी जाहीरपणे भाजपा सोडल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे राजेंद्र मस्के हे निवडणुक लढवणारच अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.