माजलगाव नेमके कोणाचे?

बाहेरच्या उमेदवारांना स्वीकारुन माजलगावकरांनी यापुर्वी दिला होता धक्कादायक निकाल !

प्रकाश सोळंके यांच्यापुढे बाबरी मुंडेंचे खडतर आव्हान !

बीड । निलेश पुराणिक
पुर्वीपासून सोळंके घराण्याचा बालेकिल्ला राहीलेला माजलगाव मतदारसंघ 229 हा अलीकडच्या काळात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जादुमुळे कधी सत्ता सोळंकेच्या पारड्यात तर कधी भाजपाच्या पारड्यात राहिलेली आहे. 2014 साली प्रकाश सोळंके यांना पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वामुळे आर.टी.देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता तर यापुर्वी 2004 साली गोपीनाथ मुंडे यांनी उमेदवारी देवून प्रकाश सोळंके यांना आमदार केले होते त्यानंतर पुन्हा प्रकाश सोळंके हे 2009 साली व 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झालेले आहेत सद्यस्थितीत महायुतीकडून प्रकाश सोळंके यांना ही निवडणुक लढवत असून त्यांना बाबरी मुंडे, रमेश आडसकर, मोहन जगताप यांचे कडवे आव्हान आहे त्यामुळे लक्ष्यवेधने माजलगाव मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधला असता आज माजलगाव नेमके कोणाचे हे सांगणे कठीण असल्याचे नागरिक सांगत आहेत.
माजलगावकरांनी नेहमीच सोळंके घराण्याला साथ दिलेली आहे. परंतू स्व. गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा ओबीसी समाज जास्त असल्याने त्यांना बाबरी मुंडे यांचे कडवे आव्हान समोर असून बाबरी मुंडे यांचा माजलगाव सह वडवणी येथील होमपिचवर दांडगा संपर्क असल्याने बाबरी मुंडे मोठे आव्हान प्रकाश सोळंके यांच्या पुढे उभे आहे. तसेच माजलगाव येथील सर्वसामान्य जनतेने गत निवडणुकीत आडसकर यांना देखील चांगली साथ दिली होती हे देखील लोक विसरत नाहीत त्यामुळे दोघांच्या मध्ये तिसरा उमेदवार लागण्याची संभाव्यता नाकारता येत नाही.
माजलगाव येथील मतदारांनी यापुर्वी बाहेरच्या उमेदवारांना जसे की आर टी देशमुख यांना स्विकारुन व आर टी देशमुख यांनी धक्कादायकरित्या प्रकाश सोळंके यांचा पराभव करुन इतिहास घडविला होता तसेच माजलगाव मतदारसंघ राखीव असतांना काँग्रेसने उभे केलेले औरंगाबादचे त्रिभुवन सावळाराम हे देखील माजलगावकरांनी स्विकारले होते.
त्यामुळे युवा बाबरी मुंडे हे माजलगाव शहरातील नसले तरी माजलगाव मतदारसंघातील आहेत तसेच रमेश आडसकर यांनी देखील माजलगावात वर्षभरापासून लक्ष घातले आहे त्यामुळे माजलगाव कोणाचे हे सांगणे आता तरी शक्य नसल्याचे मतदार सांगत आहेत.

Leave a comment