महायुती आणि महाविकास आघाडीला बीडमध्ये वंचितची जोराची टक्कर?

वंचितने घेतली 2019 साली लक्षनीय मते

बीड । निवेदक
18 वी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरात चालू असून प्रत्येक उमेदवार वचननामा आणि त्यावर असलेले संकल्प घेवून मतदाराच्या दारात जात आहे. यामध्ये अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी देखील मागे नाहीये. गत लोकसभा निवडणुकीमध्ये 92 हजारांपेक्षा जास्त मते घेणारी वंचित बहुजन आघाडीला यावेळी े बीडमध्ये मराठा उमेदवार दिल्याने बीडमध्ये, केजमध्ये, गेवराईमध्ये आणि माजलगाव तसेच ग्रामीण भागात देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला बीडमध्ये वंचितची प्रचारामध्ये जोरदार टक्कर देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंंगे पाटील हे मराठा उमेदवार असून तसेच त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे अन् बीड, केज, गेवराई आणि माजलगाव येथून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच बीडमध्ये दलितांचे मतदान देखील चांगल्या प्रमाणात आहे व उपेक्षित मराठा तरुणांचा अशोक हिंगेना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
अशोक हिंगे यांनी कोरोनामध्ये रेमडेसेवीर औषधांसाठी शासनदरबारी लढा दिला होता व अडचण असल्यास त्यांना नागरिक संपर्क करत होते त्यामुळे अशोक हिंगे यांच्या सामाजिक कार्याची दखल जनता घेते की नाही हे आता पहावे लागेल.
अशोक हिंगे यांच्या प्रचारासाठी त्यांना सहकार्य करत असलेले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गावोगावी ग्रामीण भागासह, शहरी भागात ठाण मांडून आहेत.

Leave a comment