बीड । निवेदक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये व स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रत्यक्ष जावून स्टिंग ऑपरेशन केले असता अव्वाच्या-सव्वा दरामध्येे आमच्याकडेच तपासण्या होतात तसेच बाहेरचे रिपोर्ट ग्राह्य धरले जाणार नाहीत आमच्याकडेच तपासण्या करा असा दम दिला जातो. तसेच सर्व पॅथॉलॉजी लॅबचा आढावा घेवून संबंधित लॅब चालक आवश्यक प्रमाणपत्र न घेता लॅब चालवत आहे का व त्या लॅबचालकाची लॅब चालवण्याची पात्रता व तिथे काम करणारे टेक्नीशियन यांचे शिक्षण पुर्ण आहे का? ह्या गोष्टी व तो लॅब चालक कट प्रॅक्टीस करुन नागरिकांची लुट तर करत नाही ना ? याची चौकशी करावी व सर्व नियमांचे पालन होत आहे का याचा आढावा घेण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष करण लोंढे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष ऋषीकेश गिराम पाटील यांच्या वतीने देण्यात आला होता याची दखल घेवून जिल्हा शल्यचिकित्सक बडे यांच्याकडून खासगी डॉक्टर व पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना नोटीस देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मनसेकडून शहरातील खासगी डॉक्टर व पॅथॉलॉजी लॅब येथे जावून रक्त तपासणी तसेच सोनोग्राफीच्या ट्रिटमेंटची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती त्यात त्यांना आढळून आले की, डॉक्टर व पॅथॉलॉजी लॅबवाले मनमानी करतात त्यामुळे त्यांनी जिल्हाशल्यचिकित्सक यांना भेट देवून मागणी केली तसेच मागील दोन दिवसांपासून देखील मनसेकडून आढावा घेणे सुरु आहे त्यात देखील असे आढळून आले कि अजून पर्यंत बर्याच लॅब मध्ये 11वी -12 वी चे मुलं आणि जयनाचे शिक्षण सुरु आहे असे मुलं कोणत्याही प्रकारच प्रमाणपत्र नसतांना रुग्णांचे रक्त नमुने घेतात ही अत्यंत भयानक वास्तविकता आहे. चक्क नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार फक्त स्वतः च्या फायद्यासाठी डॉक्टरांच्या संगणमातांणे सुरु आहे. तसेच शहरातील पल्स हॉस्पिटल येथील शरद नाईकनवरे या लॅब चालकाने उडवा-उडवीचे उत्तर दिले येथे असलेल्या सुनील वाघमारे यांना कमिशन सुरु आहे का? या लॅब वाल्याकडून असा सवाल उपस्थित केला जातोय आणि अश्याच प्रकारे अनेक प्रकारचे उत्तर वेगवेगळे लॅब वाले देत आहेत ते सर्व पुरावे संबंधित अधिकार्यांकडे मनसेकडून सुपूर्द केले गेले आहेत.तसेच े
तुळजाई चौक येथील सुनिल शिंदे यांची साईकृपा लॅब असलेल्या ठिकाणी मनसे पदाधिकारी गेले असता तेथे त्यांनी गावचे सरपंच बोलवून घेतात ओळखी काढून चहा पाण्यावर मिटवून घ्या अश्या प्रकारचे मत मांडतात स्वतः च्या चुका दुसर्याला दोषी ठरवून त्यावर आरोप करतात लॅब असोसिएशन चे काही पदाधिकारी मनसे पदाधिकार्यांना उडवा-उडवी चे उत्तर देतात आणि सांगतात की आम्ही सुद्धा राजकारणी आहोत आमचे संबंध आहेत आमची संघटना आहे आता जर का या संघटना अनधिकृत कृत्य करण्यास पाठपुरावा करत असेल तर मग या संघटना मॅनेज होणार्या आहेत का? अश्या कोणत्या संघटना आहेत यांचा लोकउपयोगी कार्यास विरोध करत आहेत
चक्क प्रमापत्र मागितल्यानंतर ज्या महाविद्यालयाचे प्रमाणपत्र आहेत त्या महाविद्यालयचे प्राध्यापक येऊन होत असलेल्या प्रकारास दाबण्याचा प्रकार करत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच 15-20 हजार रुपये घेऊन डीएमएलटी कोर्स चे प्रमाणपत्र मान्यता नसलेल्या संस्थाचे दिले जाते आणि एकही दिवस संस्थेमध्ये क्लास होत नाहीत असे बोगस प्रमाणपत्र देऊन अनधिकृत लॅब चालवण्यास सहाय्य करतात यांच्यावर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.