अक्कलकोट निवासी श्री श्री सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज हे नाव जरी एक वेळा उच्चारताल तरी आपल्याला या नावाचा महिमा दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभूती हेच अंतिम सत्य असतं पण त्याठी समर्पित भाव अपेक्षित असतो . धर्म हा वैयक्तिक अवस्थेचा भाग असतो . आपण जसे असतो तसं आपल्याला दिसत अथवा आपण ते मान्य करतो .ईश्वर आहे कि नाही हा ज्याचा त्याच्या व्यक्तिगत अस्थेचा भाग आहे. ईश्वराचे अनेक दुत या सृष्टी वर लोक कल्याण करण्यासाठी अवतार धारण करत असतात ती त्या वेळेची काळाची गरज असते .आध्यत्म हे आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे.शरिर नश्वर आहे आत्मा अमर असुन शरिराचे कर्म दुःख कधी कधी एवढे प्रचंड मोठे असतात कि पुन्हा उभा राहण्याची ताकद राहत नाही आणि हिच ताकद पुन्हा निर्माण व्हावी . मानवी जीवनातील अनेक विवंचना आहेत त्या मधुन सामान्य जणांना मार्ग दाखविण्यासाठी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांनी अवतार धारण केला.आपले अवातार कार्य पुर्ण केल्यानंतर या सृष्टीचा निरोप घेणं हे प्रत्येकाला क्रमप्राप्त असत. त्याच अनुषंगाने सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांनी सुद्धा आजाच्या दिवशी सृष्टीचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या कार्याची महती प्रंचड आहे.आजही लाखो लोकांच्या हाकेला धावून दुःखा मुक्त करण्याची ताकद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या पावन चरणात आहे.आजही ते एक शक्ती रूपाने लोक कल्याण करण्यासाठी आपल्या सर्व मध्ये आहेत .हिच त्यांची अदभुत शक्ति आहे. मानवी मन हे प्रचंड चंचल आहे आणि हे मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत ते अनेक समस्या दुःख शोधुन आणण्याच्या प्रयत्न करत पण हेच मन स्वामी चरणी समर्पित केले तर बहु दुःख वेदना संपुष्टात येतात.महाराष्ट्र हि साधु संत महंत यांच्या पावन स्पर्शाने पुणित झालेली भुमी आहे.भगवान श्री दत्तात्रेय यांच्या पासुन निर्माण झालेला नाथ संप्रदाय व नाथ संप्रदायातील प्रमुख संत नवनाथ ते हे विश्वची माझे घर हा उपदेश जगाला देणारे वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व पुढील कालावधीतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज,संत मुक्ताबाई,संत नामदेव महाराज,संत सावतामाळी,संत अवजीनाथ, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार,संत साईबाबा,संत महात्मा बसवेश्वर, सद्गुरू स्वामी समर्थ, सद्गुरू, गजानन महाराज,संत तुकडोजी महाराज, सद्गुरू वामन भाऊ महाराज,संत भगवान बाबा,संत मन्मथ स्वामी,अशा अनेक संत महंतांनी देशाच्या कानाकोपर्यात भगवत धर्म ज्वलंत ठेवत लोक कल्याण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य निस्वार्थ भावनेने समर्पित केले. जीवनातील सुख दुःखाच तत्वज्ञान सर्व सामान्य माणसाला समजेल असं सहज सोप्या भाषेत शब्द मध्ये निर्माण केले.निःशंक हो निर्भय हो रे मना हा जीवनाला संजीवनी प्रदान करणारा महा मंत्र जगद कल्याणार्थ प्रचंड व प्रदीर्घ साधनेतुन निर्माण करत जागाल मार्ग दाखवणारे महान सद्गुरू प्रभु भगवान दत्तात्रेय यांचे अवतार समजले जाणारे सद्गुरू स्वामी समर्थ हे अंखडीत मनःशांती चे उर्जा स्त्रोत आहेत.गुरु भक्ती आणि निष्ठा व त्याची अलौकिक शक्ती हा जीवनातील परिवर्तनाची नांदी आहे. जीवन हा सुख दुःखाचा भवसागर असुन हाच भवसागर तरूण जाण्यासाठी हरीकृपेची गरज असते .हरीकृपा होण्यासाठी सद्गुरू लाभावे लागतात.जीवनातील भव दुःख हे काळोखा सारखे असतात . काळोखात मार्ग सापडता सापडत नाही.मग याच दुःखाच्या काळोखातुन पुढे जाण्यासाठी लाखो लोकांना निरंतर मार्ग दाखविण्याचे अविरात कार्य सद्गुरु स्वामी समर्थ महाराज यांनी केले व तेव्हा पासून आजपर्यंत अंखडित पणे त्यांच्या वैकुंठ गमना नंतर सुध्दा अविरतपणे हा कृपा आशिर्वाद चालू आहे. सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांचे विचार आणि तत्वज्ञान हे आजही एवढं प्रभावी आहे कि राज्यासह देश विदेशात त्यांचे लाखो भक्त गण आहेत. त्यांच्या कृपेचा वर्षाव अंखडीत असुन लाखो भक्तांना दैनंदिन जीवनात स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने जीवन जाण्याची प्रेरणा मिळत आहे.सदगुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त कोटी कोटी प्रणाम.
गणेश खाडे
विचारवंत,साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र
