भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात लोकनेते देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा-अ‍ॅड.अजिंक्य पांडव

बीड (प्रतिनिधी)-आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे जनक,सर्व समाजाचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यात धाडसी, निर्णायक व कार्यक्षम भूमिका बजावणारे लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणारा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलला असून राज्यातील समस्त ब्राम्हण समाज त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत असल्याचे युवा नेते अ‍ॅड.अजिंक्य पांडव यांनी म्हंटले असून देवेंद्रजी यांच्याशिवाय परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होउच शकले नसते असेही ठामपणे म्हंटले आहे.
ऍड.अजिंक्य पांडव यांनी एका पत्रकाद्वारे ब्राम्हण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी कशी पुढे आली या संबंधीचा अनुभव सांगितला आहे. ऍड.पांडव यांनी पत्रकात म्हंटले आहे की,2011 साली बीडच्या शासकीय विश्रामगृहात या जेष्ठ विचारवंत तथा वक्त्या अपर्णाताई रामतीर्थकर,परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,श्री.दीपकजी रणनवरे, संपादक श्री.दिलीप खिस्ती,श्री.संतोष मनुरकर,जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे,श्री.प्रमोद कुलकर्णी,प्रा.चंद्रकांतजी मुळे, डॉ.लक्षिमकांत बाहेगव्हाणकर, अ‍ॅड.रवींद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन अन्य मागण्या बरोबर प्रमुख मागणी म्हणून ब्राह्मण समाजातील गरजवंत आणि होतकरू तरुणांच्या साठी आर्थिक विकास महामंडळ व्हावे अश्या मागणीचा ठराव करण्यात आला आणि सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचे निश्चित करण्यात आले.त्या नंतर मराठवाडयात विविध ठिकाणावरून या मागणीस उचलून धरण्यात आले आणि ब्राह्मण समाजातील थोरा-मोठ्यांनीही या मागणी साठी शक्य त्या मार्गाने पाठपुरावा करणे निरंतर चालू ठेवले,विशेष म्हणजे याच वेळी बीडला आलेल्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज(कोल्हापूर) यांची व अपर्णाताई यांची प्रदीर्घ चर्चा झाली त्यात छत्रपतींनीही ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नती साठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगून आपणही यासाठी शक्य ते प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते.त्या नंतर छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना,हिंगोली,धाराशिव या जिल्ह्यातील आणि राज्यस्तरावर व्यापक संघटन असणार्‍या ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांनी यथाशक्ती सहकार्य केले ,आंदोलन उभारले आणि ब्राह्मण समाजाचा आवाज बुलंद केला.अलीकडे परळी येथे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सर्व ब्राह्मण संघटनाच्या पदाधिकारी यांची ऐक्य परिषद घेतली.यास संपूर्ण राज्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.या परिषदेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेला शासन दरबारी तोंड फुटले कारण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनीही हा विषय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्राधान्याने मंत्री मंडळ बैठकीत घेण्या विषयी विनंती केली.त्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री.बाजीराव धर्माधिकारी, अ‍ॅड.अजिंक्य पांडव, श्री.शैलेश कुलकर्णी,श्री.मनोजजी जोशी यांच्या सह राज्यभरातील शिष्टमंडळास व्यापक चर्चेसाठी दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे निमंत्रित करून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या प्रारूप संबंधी चर्चा करून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत महामंडळ स्थापनेची घोषणा केली जाईल असे वचन दिले आणि पंधरा दिवसाच्या आत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत बहुप्रतीक्षित आणि ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नती साठी मोलाची भूमिका ठरू शकणार्‍या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची अधिकृत घोषणा केली आणि सुरवातीला 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद ही जाहीर केली आणि समस्त ब्राह्मण समाजाला दिलेला शब्द लोकनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला.ज्याचे राज्यातील ब्राह्मण समाजाने जल्लोषात स्वागत केले या विषयात खारीचा का वाटा होत नाही उचलण्यास माझ्या सारख्या समाजात कार्यरत असणार्‍या कार्यकर्त्यास संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शी झालेल्या बैठकीतील चर्चेत ब्राह्मण समाजाच्या आर्थिक हिताच्या संबंधीचा निर्णय दीर्घकाळ प्रलंबित आहे हे मान्य करून तो सोडवण्याच्या दृष्टीने मी स्वतः प्रयत्नशिल असल्याचे सांगितले होते.त्यांनी त्यांचा हा शब्द पळून ब्राह्मण समाजातील तरुणांच्या प्रगतीचा मार्ग खुला केला आहे.याची ब्राह्मण समाज सातत्याने जाणीव ठेवेल हे या पत्रकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो असे ही युवा नेते ऍड.अजिंक्य पांडव यांनी म्हंटले आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांनी ज्यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावली अश्या मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करून कृतज्ञता व्यक्त करणार असल्याचे घोषित केले आहे.हा संघर्ष उभारताना आमच्या सोबत बीड मधील प्रा.प्रेरक वैघ,प्रा.अभय पटवारी,श्री.संतोष चिंचोलकर,डॉ.गणेश आडगांवकर, प्रा.श्रीकांत कुलकर्णी, श्री.संतोष भणगे,श्री.हर्षद आडगांवकर, श्री निलेश पुराणिक, डॉ.सुहास देशपांडे,श्री.नंदु रोहे,श्री.शुभम (विक्की) जोशी,श्री.अनिल जोशी, श्री.संजय देवा कुक्कडगांवकर,श्री.महेश महाराज कुलकर्णी, श्री.अजिंक्य मुळे,श्री.गणेश जोशी, डॉ.अजय कुलकर्णी,डॉ.प्रसाद वाघिरकर,डॉ.प्रवीण रत्नपारखी, डॉ.विनोद मुळे, श्री.राहुल महाराज देशपांडे,, श्री.विकास मानुरकर, प्रा.उमेश बोबडे,श्री.हेमंत जोशी,अभिजित महाराज निर्मळ, श्री.अनिकेत जोशी,प्रा.गोविंद शिवनिकर, प्रा.मिलिंद शिवणिकर,श्री शरद कुलकर्णी,श्री.विशाल जोशी यांनी सतत संघर्ष केला.