भगवान गडाच्या नामकरणाचा वर्धापन दिनराज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडून धौम्य गडाचं भगवानगड नामकारण

एकोणिसाव्या शतकातील प्रखर राष्ट्र भक्त, भागवत धर्माचे प्रचारक आणि प्रसारक,समाज सुधारक, जगविख्यात तत्त्वज्ञानी विद्वान ,अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक,शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे आधुनिक भगिरथ , अहिंसा मार्गाने गोहत्याबंदी करणारे पाहिले संत वेद शास्त्र पारागंत, नवं निधी अष्ट सिद्धी प्राप्त सिद्ध महान तपस्वी, अहिंसा मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान देणारे व सुसंस्कृत विचारांची पिढी घडविणारे राष्ट्र भक्त, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक,राष्ट्र संत भगवान बाबा यांनी अथक परिश्रमाने बहुजनांच्या जीवनात ज्ञान प्रकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान पीठ असलं पाहिजे म्हणून निर्माण केलेला धैम्य गड आज देशाच्या वैभवात भर घालणारा धुरवतारा असून या धैम्य धैम्य गडाचे नामकरण महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली इतिहासातील भाग्यदिन म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झाल हा दुग्ध शर्करा योग असून हा शुभ योग राज्याचे तात्कालिक मुख्यमंत्री महाराष्ट्र भूषण सह्याद्री चे सिंह यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते घडुन आला .आध्यत्मिक ज्ञान परंपरा जगतातील हा दुर्मिळ योग असून इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहला गेला .भक्ती आणि शक्तीचं प्रतिक असणारा महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील व पाथर्डी तालुक्यातील खरवंडी या गावाच्या बाजुला असणा-या प्रचंड झाडीतील डोंगर माथ्यावर विस्तारलेला आणि सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी टप्यात असणार व महाराष्ट्र राज्यातील एक सुप्रसिद्ध अस पर्यटन स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झालेला दैदिप्यमान गड आज देशपातळीवर गाजतोय पण हाच गड निर्माण कसा झाला आणि या धैम्य गडाचे नामकरण कसं झालं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. भगवान बाबा यांची किर्ती आणि महती वार्याच्या गतीने पसरत होती . वेगवेगळ्या क्षेत्रातील भगवानबाबा यांच देशहितासाठीच ऐतिहासिक योगदान चरणसिमेवर होत.याच दरम्यान नारायणगडावर वारसा हक्क वाद न्यायालयात पोहचला.भगवान बाबांना गादीवर बसवणारे मंहत माणिक बाबा यांचे वैकुंठ गमन झाले होते .आध्यत्मिक ज्ञान मार्ग आणि परंपरा या मध्ये गुरू शिष्य परंपरा असते पण न्यायालयात वारसा हक्क वारसदारांना मिळतो.संत हे जगद उद्धारक असतात .वाद हा संतांचा प्रांत नसतो . म्हणून भगवान बाबांनी नारायण गड सोडला,आपले गुरू माणिकबाबा यांच्या समाधी समोर प्रणाम करून अंगावरील दागिने कपडे त्या ठिकाणी काढुन ठेवून निघाले परंतु काही लोक एवढ्यावर थांबले नाहीत बाबांच्या अंगावरील अक्षरशः सगळे कपडे काढून घेतले .बाबांनी आपल्या शेजारी उभा असणार्या अंगरक्षकाच्या खांद्यावर असणारा रूमाल घेऊन अंगावर गुडाळाला प्रभु श्रीराम ज्या पद्धतीने सर्व वस्त्र त्याग करून वनात निघाले अगदी त्याचं पद्धतीने हा प्रसंग भगवान बाबा यांच्या सोबत घडला.अनेक भक्त त्याठिकाणी उपस्थित होते त्यांनी बाबांना विनंती केली आम्ही लढतो तुम्ही फक्त आदेश द्या त्यावर बाबा आपल्या भक्तांना उद्देशुन म्हटले महंत पद हे भिक्षेची झोळी आहे आपण येथील अन्न खाल्ल आहे माझे गुरू या ठिकाणी आहेत .आणि जिथल अन्न खाल्ल तिथं बंड करण आपल्या संस्कारांचा भाग नाही म्हणून बाबांनी अंगावर पंचा घेऊन नारायण गड सोडला.बाबा गडाची शेवटची पायरी ओलंडताच काय आश्चर्य त्याच क्षणी तीनशे वर्षे जुना पिंपळ कोसळला .बाबांनी हिमालयात जाऊन तप करण्याचा निश्चय केला आणि त्या दिशेने मार्गक्रमण करत असताना खोकरमोह येथील भाविक भक्त यांनी पर्यायी गड निर्माण करावा अशी विनंती देखिल केली .त्याच बरोबर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देखिल दिले परंतु बाबा हिमालयाच्या निर्णयावर ठाम होते एकच नाही तर अनेक गावांतून गडाचा निरोप होता पण बाबा हिमालयात जाण्याच्या निर्णयावर ठाम होते आणि हिमालयाच्या दिशेने जात असताना आर्वी मार्गे खरवंडीला पोहचले गावात वार्ता पसरली गावचे पाटील बाजीराव पाटील आपल्या घरी बाबांना घेऊन गेले बाजीराव पाटील यांच्या आई मुळाच्या नेकनुर च्या होत्या .नेकनूर म्हणजे भगवान बाबा यांचे गुरू बंकट स्वामी महाराज यांच मुळ गाव असल्याने बाजीराव पाटील कासार यांच्या आई माळकरी आणि बंकट स्वामी महाराज यांच्या शिष्य होत्या. भगवान बाबा यांच्या विषयी त्यांच्या मनात खूप आदरभाव होता . कारण ही तसंच भगवान बाबा यांना आळंदी येथे सोबत घेऊन जाऊन शिक्षण देणारे बंकट स्वामीच होते . म्हणून आपल्या स्वतच्या मुला पेक्षाही भगवान बाबा वर बनुबाई कासार पाटील यांचा जीव जास्त होता .भगवान बाबा यांनी हिमलायत जाऊ नये म्हणून बाबांचं मन वळवण्याचा प्रयत्न चालू असताना भगवान बाबा यांनी दुसर्या दिवशी फिरून येतो म्हणून खरवंडी सोडली .हि वार्ता समजताच भगवानबाबा यांचे भक्त बाजीराव पाटील यांच्या आई बानुबाईनी भिष्म प्रतिज्ञा केली कि भगवान बाबा परत आल्याशिवाय अन्न गृहण करणार नाही आता बाजीराव पाटील यांच्या समोर धर्म संकट निर्माण झालं .बाजीराव पाटील हे श्रेष्ठ मातृ भक्त असल्याने आई च्या आज्ञेनुसार बाबांच्या शोधार्थ आपल्या पन्नास साठ माणसासह वेगवेगळ्या दिशेने निघाले .दरकोस दर मुक्काम करत अखेर नगरच्या रेल्वे स्थानकावर बाबांची आणि बाजीराव पाटील यांची भेट झाली बाबांनी परत चालावं म्हणून बाजीराव पाटील भक्ताच्या नात्याने वाद घालू लागले पण बाबा काही ऐकेणात बाजीराव पाटील चाणाक्ष व चतुर राजकारणी असल्याने वेळेचं महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या मुनीमाला कानमंत्र देऊन मोहिमेवर पाठवले मुनीम प्रचंड हुशार त्याने मोहीम फत्ते केली मूळचे भालगाव चे नगर जिल्ह्यातील नारळाचे ठोक व्यापारी मनसुखलाल काठेड, बाळासाहेब भारदे नगरचे जिल्हाधिकारी यांना घेऊन तो रेल्वे स्थानकावर पोहोचला चर्चेनंतर बाबांसह सर्व जण मनसुखलाल काठेड यांच्या वाड्यावर आले त्या ठिकाणी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांचे अभ्यासक म्हणून ख्याती असणारे स्वामी सहजानंद भारती आले होते. दोन महापुरुषांमध्ये चर्चा झाली बाबांनी नारायण गडावरील सर्व वृत्तांत सांगितला आणि शेवटी म्हटले मग हिमालय जाऊ नको तर कोठे जाऊ स्वामी सहजानंद भारती यांची चर्चा सफल करत बाबांचं मन आणि मत परिवर्तन करत बहुजनांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे ज्ञान पीठ निर्माण करा लोकांच्या उत्थानासाठी आपण हिमालयाच्या दिशेने नाही तर आपलं कार्य पुन्हा अश्व वेगाने हाती घ्यावे म्हणून सहजानंद भारती यांनी उपदेश केला.सहजानंद भारती यांची शिष्टाई व बानूबाई यांची अन्नत्यागाची भीष्मप्रतिज्ञा अखेर कामी आली .बाजीराव पाटील यांना यश आलं व बाबा परत खरवंडीला आले. खरवंडीला परत आल्यानंतर बाजीराव पाटलांनी दुसर्याच दिवशी बाबांचे गुरुबंधू लाला यांना पाडळी येथे घोडेस्वार पाठवून बोलवून घेतले बाबा कायम आपल्या परिसरात राहावे अशी बाजीराव पाटलांची इच्छा त्याच दरम्यान राज्यभरातून अनेक भाविक भक्त बाबांच्या भेटीसाठी येत होते .बाबा आपल्या पासुन दुर जाऊ नयेत म्हणून बाजीराव पाटील यांनी बाबांना खंरवडीचा डोंगर दाखवला बाबा या ठिकाणी गड निर्माण करा माझी सगळी संपत्ती लागु द्या पण गड बांधु बाजीराव पाटील यांची अपार श्रद्धा आणि भक्ती पाहून अखेर विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर धौम्यगडाच्याच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. खरवंडीच्या बाजूला उंच आशा डोंगरावर द्वापारयुगातील पांडवांचे गुरु धौम्य ऋषींची समाधी स्थळ याच परिसराला त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांचे पण चरण स्पर्श झालेला असं हे पवित्र ठिकाण याच परिसरात शिंगोरी येथे शृंगा ऋषी, नागलवाडी येथे वाल्मीक ऋषी, पारगाव येथे (कमंडलू) परशार ऋषी, भारजवाडी येथे भारद्वाज ऋषी, काशी येथे केदार संग्राम ऋषी, गोळेगाव येथे गलंड ऋषी, मातोरी येथे मांतग ऋषी, कोनोशी येथे कण्व ऋषि यासर्व ऋषीमुनींच्या सहवासाने पावन असा हा भूप्रदेश आणि याच ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी सन 1951 मध्ये धौम्य ऋषीच्या पादुकांचे पूजन करून वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका भगवा ध्वज फडकावला आणि उजाड अशा माळरानावर बहुजन समाजाचं आध्यात्मिक ज्ञानपीठ धौम्यगड स्थापन झाला .पाहता पाहता पाच सात वर्षांमध्ये गडाचे बांधकाम पूर्णत्वाच्या दिशेने आले ओसाड अशा मळरानावर भव्य दिव्य असा धौम्यगड उभा राहत होता, दरम्यान बाबाचे अध्यात्मिक शैक्षणिक समाजप्रबोधनाचे कार्य चालू होते बहुजन समाजाच्या दारात शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्यासाठी चे बाबांचे भगीरथ यांच्या सारखे अथक प्रयत्न अहोरात्र चालू होते. पाहता पाहता धौम्यगड बांधकाम पुर्ण झाले गडावर पंढरपूर स्थित पांडुरंगाची हुबेहूब मूर्ती जशास तशी प्राणप्रतिष्ठा करायची आणि यासाठी आपण राज्याचे प्रमुख यांना निमंत्रण देऊ म्हणून भगवान बाबा शेवगावचे आमदार विधानसभा अध्यक्ष नामदार बाळासाहेब भारदे मेहकरचे आमदार अण्णासाहेब सांगळे, गणपतराव चेपटे आणि बाजीराव पाटील अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी सर्वजण पोहोचेल.ना.बाळासाहेब भारदे यांनी यशवंतरावांना बाबांचा प्रस्ताव सांगितला हे ह.भ. प. शांतिब्रह्म भगवान बाबा आहेत पाथर्डी तालुक्यात त्यांनी धौम्यगड बांधला आहे मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आपण आमंत्रण स्वीकारावे असं मी शेवगाव मतदार संघाचा आमदार म्हणून विनंती करतो . बाळासाहेब भारदे यांचे बोला ऐकताच माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तरुण व महाविद्वान व्यक्तिमत्त्व असल्याने नम्रपणे म्हणाले माझं परम भाग्य आहे मी राज्याचा प्रतिनिधी म्हणून हजर राहिण असा शब्द देतो . भगवान बाबा यांच्या गडावर उपस्थित राहण्याचे महत भाग्य आपण सगळ्यांनी माझ्या वाट्याला आणलं त्या बद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे.मग तेथून सर्व जण परत आले निमंत्रण पत्रिका तयार झाली सगळी जय्यत तयारी सुरू झाली मुख्यमंत्री यांचा दौरा निश्चित झाला जिल्हाधिकारी अहमदनगर यांना मंत्रालयातून पत्र आलं नियमानुसार कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी झुबेरी साहेब धौम्यगडाच्या दिशेने निघाले . दौर्या यासंदर्भातील पाहणी करण्यासाठी खरवंडी येथे पोहोचले रस्ता खूप खराब होता रस्त्याची अवस्था पाहून झुबेरी साहेब चिडले बाजीराव पाटील तर अक्षरशःचिंतातुर झाले अहवाल वाईट जाईल आणि दौरा रद्द होईल ही भिती बाजीराव पाटील यांना सतवु लागली कसंबसं अंत्यंत खराब रस्त्यावरून सर्व जण गडावर आले जिल्हाधिकारी झुबेरी हे मुस्लिम गृहस्थ होते म्हणून बाजीराव पाटील यांना भिती वाटत होती दौरा रद्द होईल हि चिंता सतावत होती.झुबेरी साहेब यांनी बाबांना पाहिलं . बाबांच्या चेहर्यावरील तेज पाहून आक्षरश जिलाधिकारी झुबेरी साहेब हे प्रचंड चिडलेले असताना काय चमत्कार झाला.झुबेरी साहेब एकदम शांत झाले बाबांनी हस्त आंदोलन केले चहापाणी केले. आदरसत्कार केला चर्चा झाली प्रचंड चिडलेले जिल्हाधिकारी अगदी दौर रद्द करण्याची पुर्ण मानसिकता झाली असतांनाच बाबांच्या भेटी नंतर मात्र अचानक सगळं चित्र बदल सर्व व्यवस्थित आहे असं म्हणुन जिल्हाधिकारी परत निघाले .रिपोर्ट सकारात्मक पाठवला आणि तो शुभ भाग्यवान दिन अखेर उजाडला दि 1/5/1958 राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नगरला पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक चालू झाली बैठक संपवून धौम्यगडावर जायचं असं दौर्‍यानुसार निश्चित होत. संत कार्यात विघ्न निर्माण करणारी माणसं प्रत्येक कालखंडात असतातच. तेव्हा मध्येच कुणीतरी म्हंटल की काल खूप प्रचंड पाऊस झाला आहे गडावर जाता येणार नाही इथूनच परत गेलेलं उत्तम पण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि स्वकर्तुत्वावर मुख्यमंत्री झालेले गृहस्थ होते.संत कार्यामध्ये लोक जाणीवपूर्वक विघ्न निर्माण करतात म्हणून खरी वार्ता कळल्याशिवाय परत फिरणे नाही हा मनो निग्रह करून त्यांनी काही काळ विश्राम गृहावर थांबणे पसंत केले आणि विश्रामग्रह गाठल. इकडे धौम्यगडावर पूर्ण तयारी झालेली होती. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त जनसमुदाय जवळपास त्या काळी चार पाच लाखाच्या पुढे लोक उपस्थित राहून वाट पाहत होते मुख्यमंत्र्यांना उशीर होत आहे नेमकं कारण काय असेल म्हणून बाजीराव पाटील हे अखेर नगरच्या दिशेने मार्गस्थ झाले आणि काही वेळातच नगरच्या विश्रामगृहावर येऊन पोहोचले यशवंतराव गडावर का आले नाहीत म्हणून चाचपणी सुरू केली तर कारण समजलं .मग बाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समक्ष जाऊन खरी वार्ता सांगितली मी आत्ताच गडावरून आलो आहे रस्ता व्यवस्थित आहे यावर यशवंतराव यांनी सर्वांना गडाच्या दिशेने निघण्याचा सूचना केल्या अवघ्या काही वेळेत माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा ताफा धौम्य गडावर पोहोचला यशवंतराव गाडीतून उतरले बाबांनी सत्कार केला यशवंतराव चव्हाण बाबांचं आदरपुर्वक दर्शन घेण्यासाठी बाबांच्या पाया पडू लागले परंतु बाबांनी त्यांना अर्ध्यातूनच आपल्याकडे घेत मिठी मारून आलिंगन दिले. दोन महामानव आज एकत्र आले होते एकाची इच्छा रयतेची भौतिक उंची वाढवण्यासाठी होती तर दुसरा जगद्विख्यात तत्वज्ञानी राष्ट्र संत जण सामान्यांनची अध्यात्मिक उंची वाढवण्यासाठी झटणारा असे वेगवेगळ्या क्षेत्रातील दोन दिग्गज दैदिप्यमान पुरुष एकाच वेळी एकाच स्थळी एकाच मंचावर पाहण्याचे भाग्य रयतेला लाभले होते.तत्पूर्वी गडाचे बांधकाम पाहून यशवंतरावांनी सहज प्रश्न केला इंजिनियर कोण होता .त्याच बरोबर ब्ल्यू प्रिंटविचारली यावर बाजीराव पाटील म्हटले तसलं काहीच नव्हतं बाबांच्या सुचना नुसार काम पुर्णत्वास आलंय सगळा गड पाहून मा.मुख्यमंत्र्यांना धन्यता वाटली मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा विधी पुर्ण झाला त्याच बरोबर भगवान बाबांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थेचे उद्घाटन देखिल पूर्ण झालं .भगवान बाबांनी अंगठी, फेटा, शाल, श्रीफळ देऊन यशवंतरावांचा हदय सत्कार केला. यशवंतरावांच्या सोबत आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे मामासाहेब दांडेकर, नामदार बाळासाहेब भारदे, आमदार अण्णासाहेब सांगळे मेहकर, स्वामी सहजानंद भारती यांच्यासह राज्य विधिमंडळातील चाळिस पंचेचाळीस आमदार कित्येक आए ए एस अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. प्रस्तावना गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी केली बाबा शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होते तेव्हापासून मी त्यांना चांगला जाणतो अभ्यासात प्रचंड हुशार चाणाक्ष वैराग्यमूर्ती अष्ट सिद्धी व नवनिधी प्राप्त जगद्विख्यात तत्वज्ञानी योग विद्या वेद शास्त्र पारागंत असुन लक्ष्मी वारंवार त्यांच्या मागे धावते आहे. नशिबावर अवलंबून न राहता स्वकष्टाने नशीब घडवणारे बाबा ऐश्वर्यवान राष्ट्र संत आहेत माझ्या ज्ञानाप्रमाणे संता जवळ ज्ञान असते पण ज्ञानाबरोबर लक्ष्मीचे ऐश्वर्य संत एकनाथ महाराज यांच्यानंतर भगवान बाबा यांच्या जवळच आहे .भगवान बाबा राजयोगी संत आहेत. राजयोगी डोंगर माथ्यावर येऊन बसला तरीही ऐश्वर्य पाठलाघ करीत मागे आलेच या सुवर्ण क्षणाचे आज आपण सर्वजण साक्षीदार असुन याचा दृष्टा अनुभव घेत आहोत श्री भगवान विष्णू यांचे अंश अवतार साक्षात परब्रह्म स्वरूप भगवान तोच हा भगवान आहे सर्वजण त्यांची सेवा करा अशी स्तुती करून मामासाहेब दांडेकर यांनी आपले भगवान बाबा यांच्या विषयी अनमोल विचार मांडले.
तद्नंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपलं ऐतिहासिक मनोगत आरंभ केले पुर्वी अनेक राजा-महाराजांनी शस्त्र तलवार गाजवुन अनेक गड बांधले, जिंकले मला वाटलं तशाच पद्धतीचा हा पण गड असेल परंतु येथे ह.भ.प. परमपूज्य शांतिब्रह्म भगवानबाबांनी वेदशास्त्र गाजवून गड बांधला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तसेच निजामाच्या ताब्यातील प्रदेश स्वतंत्र करण्यासाठी लढा देणारे अनेक स्वातंत्र्यसैनिक देशभक्त बाबांचे शिष्य भक्त लाखो विचारवंतांची फौज निर्माण करणारे बाबा भगावत धर्माचे प्रचारक आणि प्रसारक तर आहेतच पण जगद्विख्यात तत्वज्ञानी म्हणून देशांच्या हितार्थ लाखो विचारवंतांची सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य करणारे राष्ट्र नायक आहेत .माझ्या सातारा जिल्ह्यातील जहाल स्वातंत्र्यसेनानी प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांची बाबांची भेट झाली होती त्यांच्या कडुन मी बाबांची किर्ती ऐकली होती. त्यांना बाबांच्या रूपांत साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडले होते . प्रसाद म्हणून बीडच्या खासदरकीच भाग्य लाभलं .त्यांच्याकडून बाबा आपल्या विषयी अनेक गोष्टी अनेक साक्षात्कार अनेक सिद्धी चे सामर्थ्य बळ मी ऐकले होते आमचे सहकारी नामदार बाळासाहेब भारदे यांनीही बाबांच्या अनेक गोष्टी सांगितल्या मी स्वतः पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी आहे देवावर आणि दैवावर माझा पूर्ण विश्वास आहे .पण आज साक्षात परब्रह्म साक्षात श्री भगवान विष्णू यांचे अंश अवतार भगवान बाबा आपलं दर्शन गडावर येऊन घेण्याचं भाग्य लाभलं हि परमेश्वर कृपाच .देशभर वारकरी सांप्रदायाची भगवी पताका फडकत आहे या मध्ये बाबांचा सिंहांचा वाटा आहे.गड किल्ले येथूनच महाराष्ट्राचा राजकीय आणि आध्यात्मिक कारभार चालत आलेला आहे तो यापुढे देखिल तसाही चालत राहील या विषयी माझ्या मनात शंका नाही. हा गड अध्यात्मिक क्षेत्रात आढळ असा नवा ध्रुवतारा आहे आणि भविष्यात रहिल .संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पासून संत एकनाथ महाराज यांच्या पर्यंत सर्व संतावर त्या त्या काळातील दुर्जनांनी अन्याय केला त्रास दिला परंतु ते शांतीब्रम्ह असल्याने असल्याने लोकांवर न रागवता त्यांच्या अपराधाला क्षमा करून उपकारच केले .जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती जन्म घेत असतात भगवान बाबा तर बैसोनी पाण्यावरी वाचियेली ज्ञानेश्वरी चंद्रमे जे आलंछन मार्तंड जे तापहिन अशी बाबांची ख्याती असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो स्वातंत्र सैनिक निर्माण करण्यामध्ये भगवान बाबांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच बरोबर मराठवाडा स्थित निजाम राजवटीत निजामाच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लोकांच्या मनामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून प्रेरणादायी शक्ती आत्मविश्वास निर्माण करून खूप मोठी स्वातंत्र्यसैनिकाची फळी बाबांच्या माध्यमातून उभी राहिली तसेच अंधश्रद्धा निर्मूलन पशुहत्या शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार अध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये जागृती लाखो लोकां मध्ये आध्यात्मिक वृत्ती वाढीस लावण्यासाठी केलेले अहोरात्र प्रयत्न याचा परिपाक अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसन मुक्त समाज निर्माण झाला .असे वेगवेगळ्या क्षेत्रातील भगवान बाबांचे अनेक कार्य सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहेत. भगवान बाबांनी अनेक शाळा सुरू केल्या, वस्तीग्रह चालवली, औरंगाबाद सारख्या शहरात गोरगरीब मुलांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून अन्नछत्र नावाने बोर्डिंग चालू केली, धौम्य गडावर त्यांनी चालू केलेल्या शाळेचे उद्घाटन संपन्न झाले असे मी घोषित करतो भगवान बाबा यांनी केलेले कार्य आणि त्यांची कीर्ती अलौकिक आहे मी पूर्वी ऐकलेली कीर्ती आणि येथे आल्यापासून पाहिलेला जनसमुदाय कार्यकर्ते आध्यात्मिक राजकीय सरकारी क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची बाबांच्या प्रति असलेली श्रद्धा ही प्रचंड आहे बाबांचे अलौकिक कार्य आणि लोकमताचा आदर म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धौम्यगडाचे नामकरण भगवानगड असे जाहीर करतो सरकारी दरबारी भगवानगड नावाची नोंद केली जाईल अशी घोषणा करतो लाखोंच्या टाळ्यांच्या गजराने आकाश दुमदुमले त्याच बरोबर भगवान विद्यालयाचे देखिल भूमिपूजन झाले असे जाहीर करतो भगवान बाबा सारख्या थोर पुरुषांच्या सानिध्यात येण्याचा महान योग आला म्हणून पांडुरंगाचे आभार मानतो असे मत व्यक्त करून मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपले मनोगत पुर्ण केले . त्या क्षणापासून धौम्यगडाचा भगवान गड झाला आणि आज देशासह विदेशात भगवान गडाची किर्ती दिवसेंदिवस वार्याच्या वेगाने वाढत आहे. यशवंतराव आणि बाबांचा स्नेह दिवसेंदिवस वाढत राहिला . यशवंतराव दिल्लीत संरक्षण मंत्री झाले आणि भारत चीन युद्ध आरंभ झाल यशवंतराव यांना दिल्लीत भगवान गडाची आठवण झाली यशवंतराव चव्हाण यांनी थेट भगवान गड गाठला आणि भगवान बाबांचे आशिर्वाद घेतले आणि संरक्षण मंत्री म्हणून अंत्यंत यशस्वी पणे भारत चीन युद्धाचा प्रश्न मिटवला. यशवंतराव यांनी राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री ते अगदी उप पंतप्रधान हि मानाची पदं भुषवली भगवान बाबा आणि भगवान गडा बद्दल कायम भक्ति भाव आणि आदर असणारे यशवंतराव चव्हाण यांच नाव आजही चारित्र्यवान कर्तव्यदक्ष जबाबदार आणि आदर्श राजकारणी म्हणून इतिहासात अमर झाल . भगवान बाबा यांच्या भक्तिचा आणि शक्तिचा जणुकाही हा प्रसादच आहे.
गणेश खाडे विचारवंत,साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र

Leave a comment