शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांचा सवाल
बीड । निवेदक
मे महिना संपत आला आहे. शहरात ठिक ठिकाणी घाणीचे सामाज्य साचले असून नाल्या तुंबल्या आहेत एक पावसाचा सटकारा आला किंवा नळाला पाणी जरी आले तर नालीचे पाणी रस्त्यावर येते तसेच ठिकठिकाणी कचरा आढळून येतोय त्यामुळे बीड नगरपालिका याची दखल घेईल की यासाठी तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा सवाल पत्रकाद्वारे शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षीचा पावसाळा तोंडावर आला आहे. यंदा मान्सून लवकरच बरसणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. हे लक्षात घेता मूल नगरपरिषद प्रशासन मान्सूनपूर्व तयारीला लागायला पाहिजे गटारलाईनची सफाई हा विषय तेवढाच महत्वाचा असून पावसाळ्यातील अडगळ थांबविणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
शहरामध्ये स्टेडियमच्या मागील रस्त्यावर तसेच जुनीभाजीमंडई, नवी भाजीमंडई, कंकालेश्वरकडे जातांना पुलाच्या बाजूला, दाउदपुरा, मोमीनपुरा, मोहम्मदीया कॉलनी, बालेपीर येथे वेळेवर नगरपालिकेकडून कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने कचरा साचल्याचे चित्र पहावयास मिळतेय. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
उन्हाळ्याच्या शेवटी शहरामध्ये मान्सूनपूर्व कामे केली जातात. यातून नागरी वस्त्यांत स्वच्छतेबद्दल नियोजन केले जाते. तसेच बीड शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याबाबत स्वच्छता, नाल्यांची सफाई, सांडपाण्याचा निचरा आदींची काळजी घेतली जाते. यावर्षी पावसाळा सुरु होण्याला काही दिवस राहिलेले असतांनाही सफाईची कामे झालेली दिसत नाहीत.
शहरात ठिकठिकाणी कचरापेटीच्या बाहेर पडून घनकचर्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. त्यात मोकाट गुरे चारा शोधून कचरा विखुरतात. यामुळे परिसरात कचरा व घाण पसरलेली दिसते. याबाबत नागरिकांनी संबंधित नगरसेवक व नगर परिषदेच्या सफाई विभागात तक्रारी केल्या. परंतु, नगर परिषद प्रशासन त्याची दखल घेत नाही. या सर्व बाबींमुळे शहरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
शहरातील घनकचरा उचलण्याचे कंत्राट नगर परिषदेने दिलेले आहे. यातील कंत्राटदाराला महिन्याकाठी लाखो रुपयांच्या जवळ रक्कम दिली जाते. शासनाचे इतका खर्च होऊनही शहरात स्वच्छता राहत नसेल तर, कंत्राट देण्याचा उपयोग काय, असा प्रश्न आहे. परंतु, काम न करताच अर्धे अर्धे असा हिशेब सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शहरांत मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. आता पाऊस सुरू झाल्यावर आणखी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. नगर प्रशासनाने आजाराची साथ येण्याआधी स्वच्छतेचा मंत्र स्वीकारावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करुन झोपलेल्या नगर परिषद प्रशासनाला हिसका दाखवू असे शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.