बीडला रेल्वे न येण्याचे कारण म्हणजे नेत्यांचे राजकारण!

रेल्वेचे भांडवल कायम निवडणुक जिंकण्याकरीताच ?

तर बीडला रेल्वे यायला 2057 ची वाट पहावी लागणार!
2014 साली गड आला पण सिंह गेला
सर्वच पक्षांकडून रेल्वे काम न झाल्याने जनतेची निराशा
बीड । निवेदक
1952 या निवडणुकीच्या वर्षापासून बीड जिल्ह्याने खासदार लोकसभेत पाठवले यामध्ये स्व.केशरकाकू क्षीरसागर, स्व.गोपीनाथराव मुंडे, गंगाधर अप्पा बुरांडे असे नावाजलेले व्यक्तीमत्व जिल्ह्यातील जनतेने निवडुन दिले. स्व.केशरकाकु क्षीरसागर यांच्या काळापासून पुढे रेल्वेची मागणी जोर धरु लागली त्यानंतर स्व.गोपीनाथराव मुंडे 2009 साली खासदार झाले परंतू त्यांचे सरकार आले नव्हते आणि 2014 साली जनतेने त्यांना खासदार केले परंतू दुर्देवाने स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब हे राहिले नाहीत त्यामुळे गड आला परंतु रेल्वेचे काम करणारा सिंहच गेला अशी भावना जनतेत झाली होती आणि होय 100 % गोपीनाथ मुंडे साहेब असते तर रेल्वे आलीच असती, उद्योग आणले असते, इतर कामेही झाली असती यात शंकाच नाही पण मुंडे साहेबांचे जाणे म्हणजे फार मोठे दुःख आणि जिल्हावासियांचे दुर्देव म्हणून त्यानंतर त्यांच्याच कन्या डॉ.प्रितमताई मुंडे या लोकांनी लोकसभेत पोहोंचल्या परंतू बीडकरांची मुख्य मागणी असणारी रेल्वे अद्यापपर्यंत स्वप्नच राहिली गेली 10 वर्ष प्रितमताई मुंडे या खासदार असतांना रेल्वेचे काम केवळ 60 कि.मी.चे अंमळनेर (ता.पाटोदा) पर्यंत झालेले आहे. 10 वर्षे सत्ता पक्षाची सत्ता असूनही 261 पैकी केवळ 60 कि.मी. इतके झाले म्हणजे 261 किमीचा परळी-बीड-अहमदनगर रेल्वे ही पुर्णत्वास यायला 43 वर्षात 261 कि.मी. म्हणजे आज रोजीपासून 2057 रोजीपर्यंत रेल्वे येईल असे सद्याच्या काम सुरु असलेल्या सरासरीवरुन दिसत येत आहे त्यामुळे रेल्वेचे भांडवल कायम निवडणुक जिंकण्याकरीताच सर्वपक्षीयांकडून झाले असल्याचे बीड जिल्ह्याची यापुर्वीची लोकसभा निवडणुकीची इतिहासाची पाने चाळली तर असे चित्र दिसून येते.
सध्या 18 व्या लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षातील नेते बीड जिल्हा दौरे करत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक सभेच्या ठिकाणी रेल्वेच्या विषयाचा मुद्दा काढला जाईल. परंतू 23 वर्ष इतका कालावधी आज रोजी सत्तेत असलेल्या भाजपाकडे बीड लोकसभेचा राहिला आणि 49 वर्षे इतर सर्वच पक्षांकडे बीड लोकसभा राहिली मात्र या सर्वांनीच बीडकर जनतेची रेल्वेच्या कामाविषयी घोर निराशाच केली सध्याच्या चित्रावरुन रेल्वे काही 2057 पर्यंत येईल असे आज रोजी चाललेल्या कामाच्या सरासरीवरुन वाटत नाही.
अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग एकूण 261 कि.मी.चा मार्ग ज्याचा एकुण खर्च यापुर्वीची आकडेवाडीनुसार 4 हजार 805 कोटी रुपये इतका आहे ज्यासाठी लागणार्‍या 99 टक्के जमीनीचे भूसंपादन आणि मुल्यांकन पुर्ण झाले आहे. 1990 साली मान्यता मिळालेला रेल्वे मार्ग म्हणजे अहमदनगर-बीड-परळी चा रेल्वे मार्ग त्यानंतर बीड जिल्ह्याने खासदार आणि पक्षांवर विश्वास ठेवत एक व्यक्ती पुन्हाः पुन्हा लोकसभेत पाठविता डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात आष्टी ते बीड आणि त्यानंतर पुन्हा अंमळनेरपर्यंत एकुण 60 कि.मी.चे काम पुर्ण झालेले आहे. आष्टी ते बीड अंतर 80 कि.मी. आहे तोच महत्वपुर्ण एक टप्पा अद्याप बाकी असतांना रेल्वेचे दोन-दोन वेळा उद्घाटन झालेले आहे खरेतर एखादा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतरच त्याचे उद्घाटन होत असते परंतू निवडणुका समोर ठेवून ही उद्घाटन होवू लागतात तर विरोधकांकडून देखील श्रेय लाटण्याचे प्रकार सर्रास होत असतात. स्टेशनच्या इमारतीचे काम पुर्ण झाले आहे. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावर एकुण 23 रेल्वेस्टेशन प्रस्तावित आहेत त्याचेच कुठे काम चालू तर कुठे जैसे थे आहे त्यामुळे इतक्या सावकाश कासव गतीने काम चालणार असेल तर ज्या गतीने काम चालू आहे त्या सरासरीने 2057 नक्की उजाडेल यात संशय नाही.

पंकजा ताई मुंडे साहेबांचे स्वप्न रेल्वे आणण्याचं होतं..
पंकजाताई मुंडे म्हणजे स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वारस त्यांनी बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरकारी दवाखाना इत्यादी महत्वपुर्ण कामे केली. पंकजाताईंनी मोठा निधी मंत्री असतांना जिल्ह्यासाठी आणला ताईंकडे नागरिक विकास नेतृत्व म्हणून पाहते त्यामुळे पंकजाताई रेल्वे कामाचा प्रकल्प तुम्ही पुर्णत्वास न्या अशी अपेक्षा जनतेतून होत आहे.
परंतू ताई खरे म्हणजे बीडला रेल्वे न येण्याचे कारण म्हणजे सर्वच पक्षाच्या नेत्यांचे राजकारण ठरले आहे अनेकदा नागरिक चुकले नाहीत त्यांनी विश्वास ठेवून अनेक प्रतिनिधी संसदेत रेल्वेसाठीच पाठविले आणि प्रत्येक अर्थसंकल्प सादर करतांना बीडकर डोळे लावून टीव्हीकडे आशेने पाहात असत मात्र बीड जिल्ह्याच्या पदरी घोर निराशाच आली होती.
स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी मात्र बीड रेल्वे प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते बीड रेल्वेसाठी 600 कोटींची तरतूद करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती तसेच केंद्राने दिले तर राज्यही देईल असे ठणकावले होते त्यांनी केंद्र सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांच्याकडे मागणी केली होती त्यांच्या त्या मागणीकडे पाहून गोपीनाथ मुंडे हेच बीडला रेल्वे आणतील असे वाटत होते म्हणून 2014 साली त्यांना जनतेने बहुमताने संसदेत पाठविले होते परंतू 2014 साली गोपीनाथ मुंडे हे आपल्यात न राहिल्याने गड आला परंतू सिंह गेला अशीच भावना जनतेमध्ये निर्माण झाली होती.

Leave a comment