बीडमध्ये चोर्‍या वाढल्या; एस.पी.साहेब खाकीचा धाक गेला कुठे?

नगरसेवक रणजित बनसोडेंची रात्रीची नागरिकांसमवेत गस्तभैय्यासाहेब मोरे,

नगरसेवक बनसोडे पोलीस कमीश्नर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार

मनसेचे वाढत्या चोर्‍या नियंत्रणात आणा म्हणून आंदोलन

बीड । निवेदक
सद्रक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद घेवून नोकरीवर येतांना जनतेच्या रक्षणासाठी वचनबद्ध झालेल्या पोलीसांकडून नागरिकांच्या कुठल्याही समस्येवर कार्यवाही करण्यास टाळाटाळ होण्यामुळे पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत का? असाच प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. कधी सामान्य नागरिकाच्या शेततळ्यावरील मोटार व केबल चोरीची घटना त्याच दिवशी माय लेकराच्या डोक्यात काठी व रॉडने मारहाण झाल्याची घटना तर त्याच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा हिरो होंडा प्लस गाडी चोरीची घटना आणि जिल्ह्यात दुसरीकडे चारचाकी गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न व व्यापार्‍याच्या दुकानावर दगडफेक त्याच्या पुढच्या दिवशी एकीकडे लोखंडी गजाने जिवे मारण्याचा प्रयत्न आणि दुसर्‍या ठिकाणी सोन्याची चोरी त्याच्या पुढच्या दिवशी शेत आमचे आहे असे कारण दाखवत मारहाण घडणे हा आढावा आहे जिल्ह्यातील गेल्या 4 दिवसातील विविध ठिकाणच्या घटनांचा त्यामुळे बीडचा बिहार होतोय असे नाही तर बीड बिहारलाही मागे टाकत आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे त्यामुळे एस.पी.साहेब खाकीचा धाक गेला कुठे? दिवसेंदिवस असेच प्रकार वाढत असतील तर गुन्हेगारांवर कायमस्वरुपी वचक निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा घेवून पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना आपल्या मार्गदर्शनाची खरी गरज आताच आहे तर कुठे गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होईल.
बीड पोलीसांचा एकेकाळचा लाठीचा आणि खाकीचा धाक आज-काल गुन्हेगारांना राहिला नसल्याचे भयावह चित्र दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखावरुन चित्र स्पष्ट होत असल्याने नागरिकांत मात्र भितीचे वातावरण तयार झाले आहे. कुठलाही नागरिक पोलीस स्टेशन येथे एखाद्या विषयाची तक्रार घेवून गेला असता पोलीस अधिकारी वा कर्मचारी ती तक्रार घेत नाही त्या नागरिकाला पोलीस कर्मचारी हे पोलीस अधिक्षक कार्यालयात पाठवतात नाहीतर गोल-गोल उत्तरे देवून परत पाठवितात त्यामुळे नागरिक कधी-कधी तर पोलीसांकडे जाण्याऐवजी एखाद्या भाई कडे जातो जिथे गेल्यामुळे किमान एखादा गुन्हेगार धमक्या देत असेल तर तो तरी देणार नाही अशी अपेक्षा ठेवून.
केवळ नोकरी केल्याचे अथवा काही कर्तव्य केल्याचे दाखवत पोलीसांकडून गुटखा पकडणे, मटका चालकांवर कारवाई होणे, वाळुचे टिप्पर पकडणे इतकीच कारवाई झाल्याचे वर्तमानपत्रात छापून येते परंतू एखादा सराईत गुन्हेगार पकडला किंवा एखाद्या ठिकाणी चोरांनी चोरी केल्यावर त्या चोराला पकडण्यात आले अशी घटना पहायला भेटत नाहीत.
सध्या बीड जिल्ह्यात पतसंस्थामध्ये भ्रष्टाचार शिरला असून यामध्ये मुख्य आरोपी व संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल करायला सुरुवातीला टाळाटाळ केली ज्यावेळी काही पोलीस अधिकारी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करत असल्याचे उघड झाले त्यावेळी उशिरा गुन्हा नोंद करण्याचे प्रकार घडू लागले परतू योग्य वेळेवर कुठलीच कार्यवाही न झाल्याने पोलीसांच्या कार्यावर शंका येवू लागली आहे तसेच जनतेमध्ये पोलीसांविषयी असणारा विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे.

नगरसेवक रणजित बनसोडेंची रात्रीची नागरिकांसमवेत गस्त
प्रभाग क्र.24 मध्ये अंकुश नगर, पालवन चौक, आशा टॉकीजजवळचा परिसर, भगवान विद्यालयाजवळील परिसर या भागात चोरट्यांचा सुळसुळाट असून नगसेवक रणजित बनसोडे हे नागरिकांसोबत राहून पोलीस कर्मचारी यांनी पेट्रोलियमसाठी गाड्या वाढवाव्यात अशी मागणी करत आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व पोलीस यंत्रणेकडून सहकार्य देखील महत्वाचे आहे असे म्हटले आहे.

भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बनसोडे पोलीस कमीश्नर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार
वाढत्या चोर्‍यांच्या प्रश्नामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. चोरांकडून कधी कोणाची गाडी ,कधी दागीने, तर कधी घर फोडीचे प्रकार करुन घरातील मौल्यवान वस्तु चोरीला जात आहेत. चोरांवर लवकर बीड पोलीसांनी कारवाई नाही केली तर पोलीस कमीश्नर यांना भेटून सद्यपरिस्थिती कळवू असे भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बनसोडे यांनी सांगितले आहे.

बीड शहर चोरांपासून भयमुक्त करण्यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड – बीड शहरात सर्वत्र सध्या चोरांचा सुळ-सुळाट सुरु असून वाढत्या चोर्‍यांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे त्यामुळे चोरांवर लगाम लावून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मनसे जिल्हा सचिव सोमेश कदम व मनसे शहराध्यक्ष करण लोंढे यांनी बीडकरांना भयमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले असून वाढत्या चोर्‍यांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, बीड आणि पोलीस अधिक्षक, बीड यांना दिले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीड शहरामध्ये मागच्या दहा दिवसापासून चोरांनी धमाकूळ घातलेला आहे आणि चोरांची भीती प्रचंड बीड शहराच्या नागरिकांमध्ये बसलेली आहे आणि या भीतीमुळे शहराचे वातावरण भीतीमय झालेले आहे आणि अशातच पोलिसांनी देखील कबुली दिली आहे की चोर खूपच खुकार असल्याचे पोलिसांनी देखील हे चोर मोठा दरोडा, रोड रॉबरी त्याचबरोबर खून देखील करण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितल्यामुळे बीड शहरात भीतीच मोठं वातावरण निर्माण झालेला आहे आणि ही परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली की काय? असा प्रश्न बीड शहरातील नागरिकांमध्ये पडलेला आहे. वाढत्या चोर्‍यांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि बीडकरांना भयमुक्त करावे लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात नाही आली आणि चोरांना अटक नाही झाली तर आणखीन तीव्र आंदोलन करु असे पत्रकाद्वारे जिल्हा सचिव सोमेश कदम , शहराध्यक्ष करण लोंढे, कुणाल उगले उपजिल्हाध्यक्ष, ऋषिकेश गिराम विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a comment