बीड । निवेदक
शहरातील विश्वास नगर, पांगरी रोड भागातील कल्याण बाबुराव ढरपे यांच्या घरात कोणी नसताना चोरट्यांनी त्यांच्या कुलूप बंद घरात चोरी करण्यासाठी चक्क कुलूपाची दुसरी बनावट चावी तयार केली. त्या आधारे घराचा दरवाजा उघडून कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. घरफोडीची ही घटना 12 ते 13 डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कल्याण ढरपे यांचे फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.