बँक ऑफ बडोदाकडून होणार्‍या गैरसोयी आणि त्रासाला कंटाळुन ग्राहकांची जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार

जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची निवेदनाआधारे केली मागणी

बीड । निवेदक
शहरातील सुभाष रोड येथील बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकांना ये-जा करण्यासाठी तसेच दारात वाहन उभे करण्यासाठी, बँकेत गेल्यावर बसण्यासाठी आसन व्यवस्थान नसल्याने तसेच बँकेत आलेल्या ग्राहकाला हवा घेण्यासाठी देखील कोणतीच व्यवस्था नसल्याने तसेच बँक व्यवस्थापनाकडून देखील कोणतीच व्यवस्था न झाल्याने बँकेचे ग्राहक मनोज देशमुख, सुदर्शन शिंदे, सुनिल बुंदेले, प्रविण कुलथे, लखन करंडे यांनी जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेवून या संदर्भात लेखी तक्रार केली आहे.
पुढे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बँक शाखेच्या इमारतीची अवस्था ही अत्यंत दुर्धर व बीड नागरिकांस गैरसोईची आहे. प्रथमतः शाखेमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात आलेला उतार हा खूप लहान व अडचनीची आहे. त्यावरून वृद्ध व्यक्तीला आणि इतर कोणत्याही व्यक्तीला देखील जाण्यापुरती जागा आहे व हा उतार समोरील नाली शेजारी असल्याने वृद्ध ग्राहकांची खूप गैरसोय होत आहे या ठिकाणी अनेक वृद्ध व्यक्ती ये- जा करत असतांना जमिनीवर पडलेले आहेत.
या शाखेमध्ये व्यवहारासाठी जायचे असल्यास कोठेही पार्किंग व्यवस्था नाही. जर दुसरीकडे वाहन पार्क केले तर शेजारील दुकान मालक मनाई करतात व त्यामुले वाहतुकीची नेहमी कोंडी होते या शाखेला कोठेही हवा येण्यासाठी जागा नाही व ज्याने आतमध्ये प्रवेश केल्यानंतर श्वसनाचा त्रास होतो. आत बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था आहे, परंतु तिथे होणार्‍या गुदमरण्याचा त्रास हा कोणत्याही सामान्य माणसाला आणि विशेषतः वयोवृद्ध लोकांना असह्य होतो.
तसेच पावसाच्या वातावरणामधे वरील छतामधून पाणी टपकते. ग्राहकांची लॉकर फॅसिलिटी सुद्धा शाखेमध्ये आहे परंतु शाखेची इमारत ही मजबूत नाही हे सर्वेक्षण केल्यावर देखील सांगता येईल.या संदर्भात संबंधित व्यवस्थापकास वारंवार तोंडी व लेखी सुचना करूनही कसल्या प्रकारची दखल घेतली जात नाही. तेव्हा जिल्हाधिकारी साहेब आपणच आपल्या स्थरावरूनच संबधित बँक प्रशासनास आदेशीत करावे की, सध्याची जागा ही शाखेसाठीही योग्य नाही व ग्राहकांसाठीही सोयी बँक व्यवस्थापनाकडून देण्यात याव्यात यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी पत्रकाआधारे केली आहे.

Leave a comment