प्रमाणपत्रांचा डाटा, सगे सोयर्‍यांसोबत अध्यादेश, गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र, मोफत शिक्षण आणि राखीव जागा ठेवण्याबाबत निर्णय घ्या

आझाद मैदानाकडे निघालो तर मागे फिरणार नाही-मनोज जरांगे पाटील

मुंबई । निवेदक
प्रमाणपत्रांचा डाटा, सगे सोयर्‍यांसोबत अध्यादेश, गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र, मोफत शिक्षण आणि राखीव जागा ठेवण्याबाबत निर्णय घ्या आझाद मैदानाकडे निघालो तर आता मागे फिरणार नाही अशा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारकडे तीन मागण्या केल्या. त्या मागण्यासंदर्भात आज रात्रीत अध्यादेश द्यावा, नाहीत आदोलन सुरु राहणार. अध्यादेश दिला तर मुंबईत विजयाचा गुलाल घेऊन येणार असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले, मी आरक्षणासाठी इथपर्यंत आलो आहे. अंतरवाली सराटीत असताना देखील आमची हीच मागणी होती. यावेळी जरांगे म्हणाले, मला जेवढे वितरीत केले त्या 37 लाख प्रमाणपत्रांचा डाटा पाहिजे. सगे सोयर्‍यांबाबत अध्यादेश पाहिजे. गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र पाहिजे. मोफत शिक्षण आणि राखीव जागा ठेवण्याबाबत निर्णय पाहिजे, अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.
मनोज जरांगे म्हणाले आझाद मैदानाकडे निघालो तर माघारी फिरणार नाही. आझाद मैदानाबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचा वेळ त्यांनी सरकारला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे. नाहीतर मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.

Leave a comment