प्रत्येकाच्या नावापुढे वडिलाप्रमाणे आईचे देखील नाव लावावे – संजय होळकर यांच्या मागणीला यश

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर दिला होता उपोषणाचा इशारा

बीड (निवेदक)- बीड येथील जननगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य बचतगट संघटना संस्थापक संजय द्वारकाबाई बाबूराव होळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार निवेदने दिली होती परंतू त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे दि.3 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष भेटून सर्वसामान्य लोकांच्या व महिलांच्या बाबतीत अनेक समस्यांच्या निराकरणासाठी निवेदने दिली होते त्यात त्यांनी प्रत्येकाच्या नावापुढे वडिलाप्रमाणे आईचे देखील नाव लावावे अशी मागणी केली होती सदरील मागणी मान्य न झाल्यास 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनापासून मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर व मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. सदरील मागणीची दखल घेत सरकारकडून प्रत्येकाच्या नावापुढे वडिलांबरोबरच आईचे नाव लावण्यासाठीचा शासन निर्णय घेवून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या नावासमोर वडिलांबरोबर आईचे नाव लावून अंमलबजावणी सुरु केली आहे त्यामुळे नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य बचतगट संघटना संस्थापक संजय द्वारकाबाई बाबूराव होळकर यांच्या मागणीला यश आल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जननगरसेवक संजय होळकर यांच्याकडून विविध मागण्यांसाठी दि.3 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री यांच्या घरासमोर व मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्या विविध विषयांपैकी 1 विषय म्हणजे प्रत्येकाच्या नावासमोर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचे देखील नाव लावावे असा शासन निर्णय घ्यावा व तो तातडीने अंमलात आणावा अशी मागणी केली होती व निवेदनात असे म्हटले होते की, आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलाच्या नावासोबत आई-वडिलांचे नाव लावले जात नाही हे अत्यंत चुकीचे व आईवर आणि महिलांवर अन्याय करणारे आहे त्यामुळे आईचा व महिलांचा सन्मान वाढण्यासाठी असा निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती त्यानुसार मंत्रालयीन अधिकारी व मंत्रालय पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेले मलबार हिल पोलीस अधिकारी यांच्याकडून संजय होळकर यांना संपर्क करुन व मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून उपोषण मागे घ्या अशी वारंवार विनंती केली होती. त्याबाबतीत संजय होळकर यांनी सदरील मागण्या मान्य झाल्या तरच उपोषण मागे घेवू अशी भूमिका घेतल्यामुळे दि.25 जानेवारी 2024 रोजी नगरविकास विभागाचे अव्वर सचिव यांनी ज्या बीड नगर पालिकेच्या बाबतीत सफाई कामगारांविषयी मागण्या होत्या त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी बीड यांना तात्काळ ई-मेल करुन त्याची प्रत संजय होळकर यांना देवून उर्वरित मागण्या ह्या शासन स्तरावरच्या असल्यामुळे त्या मार्गी लागण्यासाठी काही अवधी द्यावा अशी विनंती केली होती त्यानुसार संजय होळकर यांनी दि.25 जानेवारी 2024 रोजी सायं 5.30 वाजता सदरील उपोषण काही दिवसासाठी स्थगित करत असल्याचे मुख्यमंत्री यांना लेखी दिले होते. त्यानुसार दि.11 मार्च 2024 रोजी वडिलांसोबत आईचे नाव लावण्याचा शासनाने निर्णय घेतला असून तो जाहिर करुन मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांच्या नावापुढे वडिलांसोबतच आईचे नाव असलेल्या पाट्या मंत्रालयात लावून संजय होळकर यांच्या मागणीप्रमाणे निर्णय घेवून अंमलात आणल्यामुळे संजय होळकर यांच्या मागणीला यश आले असून त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a comment