पेठ बीड येथील माऊली गणेश मंडळाच्या गणपतीची उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या हस्ते गणेश आरती

संविधान फ्रेम, शाल, श्रीफळ देवून सत्कार

बीड (वृत्तसंस्था)ः शहरातील करीमपुरा माऊली चौक येथील माऊली गणेश मंडळाच्या वतीने दि.11.09.2024 बुधवार रोजी श्रीगणेशाची आरती उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या हस्ते गणेशभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी त्यांना गणेश मंडळाच्या वतीने संविधानाची फे्रम भेट देवून सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रमास जगदीश सिकची, श्री.सातपुते, ओमप्रकाश भुतडा, मन्मथ रुक्कर, अ‍ॅड.बालाप्रसाद सारडा, संतोष वाघ, नितीन रुक्कर, पवन सरवदे, पंकज सरवदे, आकाश रत्नपारखी, हर्षल वाघ, अभय मिटकर, धनंजय सरवदे, साई सरवदे, श्री.धाबे, ओम वाघ, गजानन बन्सोडे, तसेच महिला भगिनींमधून सौ.सिकची, सौ.भुतडा, सौ.वाघ, सौ.धायरे आदी गणेश भक्तांची उपस्थिती होती.

Leave a comment