पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनवणेंमध्ये यांच्यामध्येच सामना व वाढती चुरस!

बीड । निवेदक
काल शिवसंग्रामच्या डॉ.ज्योती मेटे यांनी आपण कुठलीही निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये क्रमांक 2 ला राहिलेले बजरंग सोनवणे यांच्यामध्ये आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यामध्येच आता उघड उघड सामना होणार असल्याचे चित्र नागरिकांना पहावयास मिळत आहे त्यामुळे दोन्हीही उमेदवारांकडून आता रस्ते, जिव्हाळ्याचा रेल्वे प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न याबाबत निवारण करणार असल्याचे वचन देवून मतदारांच्या भेटी-गाठी होत आहेत त्यामुळे उमेदवारांची वाजंत्री वाजत असल्याचे पाहण्यास भेटत आहे. पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातच मुख्य लढत व वाढती चुरस असल्याचे डॉ.ज्योती मेटे यांच्या माघारीमुळे स्पष्ट होत आहे.
गतवेळी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये प्रितम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांंच्यामध्येच सामना पहावयास मिळाला होता त्या निवडणुकीमध्ये डॉ. प्रितमताई मुंडे यांना 6,78,175 इतकी मते मिळविली होती तसेच क्रमांक 2 असलेले त्यावेळेचे राष्ट्रवादीचे उमेदवार यांना 5,09,807 इतकी मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीला 92,139 इतकी मते मिळाली होती. या चित्रावरुन असे स्पष्ट होते की यावेळेस पंकजाताई मुंडे यांनी संपुर्ण शक्तीनिशी निवडणुकीत उतरल्या आहेत त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख सर्व मिळून मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी देखील 350 पेक्षा जास्त खेड्यापाड्यांचा दौरा केला असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. बीड तालुका पिंजून काढला आहे तसेच त्यांचा केजमध्ये दांडगा परिचय आहे तसेच त्यांना काँग्रेसचे रजनीताई पाटील, अशोकराव देशमुख, राजेसाहेब देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, रत्नाकर शिंदे यांचा व दलित-मुस्लीम मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
बजरंग सोनवणे यांची जमेची व भक्कम बाजू म्हणजे डॉ.ज्योती मेटे यांनी निवडणुक न लढवण्याचा निर्णय विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत डॉ.ज्योती मेटे यांनी मतांचे विभाजन होवू नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचे सांगितले याचा फायदा बजरंग सोनवणे यांना होईल अशी चर्चा नागरिकात आहे. कारण बजरंग सोनवणे यांनी आणि डॉ.ज्योती मेटे यांनी निवडणुक लढवली असती तर मराठा समाजाच्या मतांचे विभाजन दोन्ही उमेदवारामध्ये झाले असते त्यामुळे डॉ.ज्योती मेटे यांनी निवडणुकीतून माघार घेणे हा बजरंग सोनवणे यांच्यासाठी प्लस पाँइट मानल्या जात आहे.
तर पंकजाताई मुंडे यांना देखील त्यांचे बंधू आणि बीडमध्ये क्रमांक 1 चे पावरफुल नेते पालकमंत्री धनंजय मुंडे, बहीण प्रितमताई मुंडे, गेवराईमधून अमरसिंह पंडित, आ.लक्ष्मण पवार यांनी आष्टी-पाटोदा-शिरुर का.येथून सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, माजलगावातून आ.प्रकाश सोळंके, केज मतदारसंघातून आ.नमिता मुंदडा यांनी तर बीड शहरातून राजेंद्र मस्के यांनी खासदार बनवण्यासाठी दिवस-रात्र एक करत मतदारांपर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे बीडची निवडणुकीचा परिणाम काय होईल याचे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होईल असे मतदारांमध्ये बोलले जात आहे.
तसेच आतापर्यंत झालेल्या 17 सार्वत्रिक निवडणुकांपैकी, शेवटच्या म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक 78 महिला खासदार निवडून आल्या. ज्यामध्ये 2019 च्या निवडणुकीमध्ये 8 खासदार निवडुन आल्या होत्या. तसेच आतापर्यंत महाराष्ट्राने 1952 पासून सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 77 महिला खासदार निवडुन आल्या होत्या त्यामुळे जर यावेळी पंकजाताई मुंडे विजयी झाल्या तर त्या 78 व्या महिला खासदार होतील. तसे पाहता बीड जिल्ह्याने यापुर्वी स्व.केशरबाई क्षीरसागर, रजनीताई पाटील, डॉ.प्रितमताई मुंडे यांना मतदान करुन संसदेमध्ये पाठविल्याचा इतिहास आहे.

Leave a comment