निष्ठा आणि समर्पणाचे महासागर सर्व शक्तिमान बलशाली सोबतच सर्व सिद्धी चे दाता असुन देखिल हनुमान जी हे कधीचं स्वतःची स्तुती ऐकण्यासाठी इच्छुक नाहीत तर आपले गुरू प्रभु श्रीराम यांची स्तुती ऐकण्यासाठी ते सदैव आतुर असतात हिच हनुमान जी यांच्या भक्ति ची श्रेष्ठता आहे.श्री महाबली चिरंजीव हनुमान जी यांचा महिमा एवढा अगाघ आहे कि त्यांच्या कार्याच, सामर्थ्याचे वर्णन करण निव्वळ अशक्य प्राय असंच आहे.शब्द त्यांच्या कार्या समोर तोकडे पडतील.जिज्ञासा काय असते हे जगाला शिकवलं जन्म होताच क्षणी जिज्ञासा झाली म्हणून तर थेट सुर्याला फळ समजुन यशस्वी गिळंकृत केल.वायु पुत्र केसरी नंदन हनुमान हे सकल सिद्धी चे दाता जगातील सगळ्यात बलशाली तितकेच नम्र अज्ञाधारक निष्ठावान आणि प्रभु श्रीराम यांच्या संघर्षात क्षणोक्षणी आपलं गुण कौशल्य आणि बळ याच सुयोग्य संगम दाखवत यशस्वी कामगिरी बजावणारे कुशल योद्धा आपल्या सगळ्यांचे दैवत महाबली हनुमान हे चिरंजीव असल्याने महाबली हनुमान यांच्या जन्मोत्सव आपण सगळ्यांसाठी आनंददायी सोहळाच आहे.या सृष्टीवर कोणताही कार्य हनुमान जी यांच्या समोर अवघड नाही कठिण नाही.कवन सो काज कठिन जग माहीं। जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं॥
राम काज लगि तव अवतारा। सुनतहिं भयउ पर्बताकारा
कनक बरन तन तेज बिराजा। मानहुँ अपर गिरिन्ह कर राजा॥
सिंहनाद करि बारहिं बारा। लीलहिं नाघउँ जलनिधि खारा
सहित सहाय रावनहि मारी। आनउँ इहाँ त्रिकूट उपारी॥
जामवंत मैं पूँछउँ तोही। उचित सिखावनु दीजहु मोही॥
प्रभु श्रीराम यांच्या चरणी वंदन करून माता सीतेचा शोध घेत घेत निघालेले निवडक वानर सैन्य व महाबली हनुमान हे शेवटी दक्षिणेकडे येऊन समुद्र किना-यावर येऊन स्थिरावले.माता सीतेचा शोध काही लागला नाही पण रावण समुद्र ओलांडून माता सीतेला घेऊन लंकेत गेला आहे.एवढी माहिती मात्र मिळाली.महिती आधारे शोध घेयचा पण समुद्र अडवा आहे .मग पुढे काय सगळे चिंतातुर हनुमान जी ध्यनस्त बसले होते.सगळ्यात जेष्ठ जांबुवंत होते.मग चर्चा चालू झाली कोणाची उडी किती लांब जाऊ शकते.अखेर लंके पर्यंत कोणीही पोहचणार नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्या वेळी जांबुवंत जी यांनी हनुमंत यांची स्तुती करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.स्वतःची स्तुती ऐकण्यासाठी हनुमान जी उत्सुक नाहित ते अजुनही शांत आहेत हे लक्षात येताच.मग शेवटी जांबुवंत जी प्रभु श्रीराम यांची स्तुती करून हनुमंता जी यांना आठवण करून देतात कि हे हनुमंता आपला जन्म राम कार्यासाठी झालेला आहे.आपण क्षणाचाही विलंब न करता उठा असं खचुन जाऊ नका स्वतः मधला आत्मविश्वास जागा करा आपल्याला प्रभु श्रीराम यांचं कार्य सिद्धीस घेऊन जायचं आहे.स्वतःची स्तुती ऐकण्यात स्वारस्य नसणारे हनुमान जी महाराज हे प्रभु श्रीराम यांची स्तुती ऐकताच विशाल पर्वाताकार झाले.अंगात तारूण्य संचारले मग काय सर्व तरूण वानर यांनी हनुमंत यांना समुद्रातील पाणी पिउन समुद्र कोरडा पाडावा आणि मग लंकेत जाऊ असा सल्ला दिला हा सल्ला ऐकताच विशाल पर्वाताकार हनुमान जी सज्ज झाले एवढ्यात जेष्ठ जांबुवंत यांनी सल्ला दिला.कि समुद्र आपल्याला अटावायचा नाही तर तरूण जायाचा आहे. समुद्र उल्लंघन करून लंकेत जायचं आहे आणि हा सल्ला हनुमान जी यांनी मान्य केला. ज्येष्ठांचा सल्ला तरूणांनी स्वीकारला म्हणून सुंदरकांड अति सुंदर ठरलं हाच संयम आणि अनुकरण सध्याच्या काळातील तरूणाईला गरजेचं आहे ज्येष्ठांचा सल्ला ऐकला तर जीवनात सुंदरकांड घडत जीवन हित होत.प्रभु श्रीराम यांच्या नावाचा जयघोष करत हनुमान जी यांनी लंकेच्या दिशेने यशस्वी उड्डाण घेतलं.लंकेत गेल्यावर सुक्ष्म रूप धारण करून लंकेचा भेद घेतला शत्रू सैन्याचा आढावा घेतला माता सीतेचा शोध घेऊन माता सिता यांना रामकथा ऐकवुन विश्वास दिला . प्रभु श्रीराम यांनी दिलेली ओळख खुण मुद्रिका दाखवली आणि ओळख पटवून माता सितेचा निरोप आशिर्वाद घेऊन रावणाला थोडासा चमत्कार दाखवला लंका दहन करून परत आले. प्रभू श्रीराम आणि वानर सैन्य यांना समुद्र वर सेतु बांधत लंकेत घेऊन आले.युद्धाच्या वेळी देखील वेगवेगळ्या पाशातुन राम लक्ष्मण यांना मुक्त करण तसंच अहिरराव महीराव यांच्या ताब्यातुन राम लक्ष्मण यांची सही सलामत सुटका करण त्या सोबतच लक्ष्मणाला ज्यावेळी शक्ति लागली. त्या वेळी रातोरात वल्ली आणुन लक्ष्मणचा जीव वाचवण असे अनेक वेगवेगळे प्रसंग हनुमान जी यांनी यशस्वी केले . प्रभु श्रीराम यांनी ह्या सृष्टी चा निरोप घेताना लोक कल्याण करण्यासाठी लोकांचे दुःख वेदना या मधुन सोडवणुक करण्यासाठी हनुमान जी यांना आदेश दिला कि आपण चिरंजीवी आहात आम्ही निघतोय पण आपण तहयात चंद्र सूर्य असे पर्यंत आपण या सृष्टीचे विघ्नहर्ता म्हणून युगो युगे निवास करावा.म्हणून अर्जुनाच्या रथावर हनुमान जी आरूढ होते.आजही आपल्याला जेव्हा जीवनात वेगवेगळ्या अडचणी समस्या जाणवत असतात तेव्हा आपण हनुमान जी यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर अगदी सहजपणे मार्ग निघातात.
लेखक – गणेश खाडे, बीड वचारवंत,साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र