प्रत्येक गुजराती माणूस हा कागदोपत्री भाई असतो आणि आंध्रा चे सर्वच लोक राव असतात, प्रत्येक मराठी माणूस त्याच्या वडिलांच्या नावाने ओळखला जातो परंतू काही दिवसांपुर्वी मंत्री मंडळाच्या बैठकीत शासनाने एखाद्या व्यक्तीचे पुर्ण नाव टाकतांना वडिलांच्या नावापुढे आईचे नाव लावणे आता बंधनकारक आहे असा उत्स्फुर्त निर्णय घेतला खरोखर हा निर्णय घेतला आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण उशीरा का होईना स्त्री हिताचा स्त्रीला सन्मान देणारा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. यापुर्वी शासनाने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय जसे की, महिला आरक्षण, बचत गटांना अर्थ सहाय्य, मुलगी शिकली तर प्रगती होईल या टॅगलाईनखाली शिक्षण योजना, महिलांसाठी मातृत्वाची रजा, विविध योजनांमधून महिला सबलीकरण असे अनेक महत्वपुर्ण निर्णय शासनाने घेतले ज्यामुळे स्त्रीला समान हक्क मिळू लागले स्त्रीया प्रगल्भ होवू लागल्या परंतू एखाद्या व्यक्तीचे पुर्ण नाव टाकतांना वडिलांच्या नावापुढे आईचे नाव लावणे या निर्णयामुळे स्त्रीला खरोखर समसमान वाटा मिळणार आहे. कारण कोणत्याही पुरुषाच्या यशाच्या मागे एका स्त्री असते हे मानायला असंख्य पुरुष तयार होत नाहीत परंतू कोणत्याही पुरुषामुळे बाळाचे संगोपन होते, बाळ मोठे होते, संस्कारित होते हे तर पुरुषांना मान्य करावेच लागेल त्यामुळे त्याचे सर्व श्रेय त्या मुलाच्या आईला यापुर्वी मिळत नव्हते तिची ओळख एका टि.सी.ची अथवा मार्कमेमोची प्रत सोडली तर इतर नावापुढे वडिलांचेच नाव लावून आईची ओळख झाकल्या जात होती तसेच खरे तर आधार कार्ड, पॅन कार्ड या शासनाच्या महत्वपुर्ण ओळखपत्राच्या सेवा. ज्या ओळखपत्रा आधारे नागरिकांना अनेक अधिकार प्राप्त होतात. हे कार्ड नवीन काढतेवेळी आईचे नाव विचारले जाते परंतू कार्डवर देखील छापून येते ते वडिलांचेच नाव हा अन्याय आता होणार नाही तो अन्याय आता खोडला गेला आहे त्यामुळे स्त्रीने केलेल्या प्रामाणिकपणे कष्टाला, प्रामाणिकपणाला शासनाकडून एक न्याय दिला गेला आहे.
आपल्या देशात कोणत्याही व्यक्तीचे नाव कसे लिहावे यासंदर्भात ‘स्पष्ट कायदा नसल्याने’ वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या पद्धतीने नावे लिहिली जातात. वेगळ्या पद्धतीने लिहिलेले नाव जेव्हा महत्वपूर्ण आर्थिक दस्तावेजात लिहितांना नावातली अगदी छोटीशी चूक म्हणजे काना मात्रा वेलांटी किंवा गॅप ही चूक सुद्धा बर्याच वेळेला एखाद्याला संकटात टाकू शकते. स्वतः विकत घेतलेल्या घराच्या नोंदणीकृत खरेदीखताच्या पेपरवर नावाची स्पेलिंग चुकल्यास ते घर नाव दुरुस्त केल्या शिवाय विकू शकत नाही आणि झालेल्या चुकीला दुरुस्त करण्यासाठी वेळ पैसा आणि प्रयत्न खर्च होतात या सर्वांची निष्पत्ती आपल्याला निष्कारण मानसिक क्लेश देऊन जाते. आपल्या देशातील काही प्रांतात, स्वतःच्या नावाबरोबर आईचे किंवा वडिलांचे नाव आणि पुढे आडनाव लिहिले जाते, तर काही प्रांतात व्यक्तीची एकेरी नावच लिहिले जाते, आडनावाची गरज नसते. काही दक्षिण भारतीय प्रांतात व्यक्तीच्या नावाबरोबर वडिलांचे नाव, जातीचे नाव, गावाचे नाव, आडनाव इत्यादी विविध शाब्दिक अलंकार आपल्या नावाबरोबर लिहिण्याचे प्रचलन आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा भागात तर फक्त स्वतःचे नाव आणि त्याबरोबर जाती वाचक म्हणजे शर्मा, सिंग, दास एवढच लिहिले जाते. उत्तर भारतीय प्रांतात आणि दक्षिणेतील काही प्रांतात नाव लिहितांना तिथे सुद्धा वडीलांच्या नाव आणि आडनाव लिहिण्याची प्रथा आहे पण ते वेगळ्या कॉलम मध्ये लिहिले जाते.
वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तीचे नाव लिहिण्यात येते, हा फरक बर्याच वेळेला व्यक्तिगत जीवनात अनपेक्षित समस्या घेऊन येतो. महाराष्ट्रात जेव्हा इयत्ता पहिलीत मुलाचा दाखला घेतला जातो तेव्हा शाळेतील रजिस्टर मध्ये मुलाचे नाव नोंद करून घेताना सर्वात शाळेतील रजिस्टर वर असलेल्या कॉलम प्रमाणे अगोदर आडनाव पुढे स्वतःचे नाव आणि शेवटी वडिलांचे नाव लिहिले जाते. पुढे शाळेतून कॉलेजमध्ये जाताना सुद्धा हेच नाव प्रचलित होते. कॉलेज पूर्ण झाल्यावर जॉब वगैरे करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी बनवताना शाळेतले लिव्हिंग सर्टिफिकेट वर लिहिलेले नाव पुढेही ग्राह्य धरले जाते. अशा पद्धतीने नाव लिहिण्याची ‘प्रथा’ फक्त महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये एक सारखी आहे. बर्याच शाळा विद्यार्थ्यांच्या नाव लिहिण्याअगोदर कुमार किंवा कुमारी हे सुद्धा लिहितात. अशा पद्धतीने लिहिलेले नाव असलेला महाराष्ट्रातील व्यक्ती जेव्हा केंद्रीय सेवेत कार्य करण्यासाठी इतर प्रांतात जातो तेव्हा त्याचे विविध ठिकाणी नाव नोंदवून घेताना नेहमीच भयंकर गोंधळ होत असतो. आपल्या नावाचे शेकडो रूप याची देही याची डोळा पाहायला भेटतात. आपल्या देशातील पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण अर्थात सर्व प्रमुख प्रांतात शासन व्यवस्थेत कार्य बघताना मराठी माणसांच्या बाबतीत नावाच्या संदर्भात येणारी समस्या यापुर्वी अनेकदा दिसून आली होती आणि डॉक्युमेंट इमिग्रेशन विभागात अथवा विविध डिपार्टमेंटला क्लियर होण्यास भयंकर त्रास होतो. थोडक्यात महाराष्ट्रात नाव लिहिण्याची पद्धती फारच किचकट होती परंतू आता नाव कसे असावे हा आदर्श ठेवत नावाशी जोडलेल्या समस्येचे महाराष्ट्र सरकारद्वारा आदर्शपूर्ण समाधान केले गेले जे भविष्यात इतर राज्यांना देखील आकर्षित करेल त्यामुळे त्याबद्दल धन्यवाद सरकारला धन्यवाद !