तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीला राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार 2024-25

माजलगाव । लक्ष्यवेध प्रतिनिधी

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना सभासदांच्या प्रगतीला प्राधान्य देणार्‍या तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., माजलगाव या संस्थेला मोठा सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा दिपस्तंभ पुरस्कार सन 2024-25 संस्थेला जाहीर झाला.
या पुरस्काराचे वितरण 13 ऑक्टोबर 2025 रोजी गोकर्ण, कर्नाटक येथे आयोजित भव्य कार्यक्रमात करण्यात आले आहे.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत शेजूळ व उप मुख्य कार्यकारी श्री. अशोक शेजूळ यांनी दिपस्तंभ पुरस्कार स्वीकारला संस्थेच्या सर्वांगीण प्रगती, नाविन्यपूर्ण सेवा व सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा सन्मान म्हणून हा गौरव मिळाल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.
8 सभासदांच्या विश्वासाला मुकुट – तुळजाभवानी अर्बनला दिपस्तंभ पुरस्कार 8
संस्थेच्या या यशाबद्दल अध्यक्ष मा. चंद्रकांत शेजूळ साहेब, सीईओ मा. शहाजी शेजूळ साहेब, तसेच संचालक मंडळ व सर्व कर्मचारीवृंद यांनी आनंद व्यक्त केला.
हा पुरस्कार म्हणजे आमच्या सभासदांच्या विश्वासाचे प्रतिक आहे. तुळजाभवानी अर्बनने सदैव सभासद व ग्राहककेंद्री काम केले आहे. भविष्यात आणखी आधुनिक सुविधा व उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे, असे अध्यक्ष मा. चंद्रकांत शेजूळ साहेब यांनी सांगितले.यशामुळे संस्थेच्या सर्व सभासदांमध्ये उत्साह नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास सीईओ मा. शहाजी शेजूळ साहेब यांनी व्यक्त केला.

Leave a comment