तुम्ही कमळाला का मतदान केले म्हणून मारहाण

बीड । निवेदक
तुम्ही कमळाला का मतदान केले आता तुम्हाला जिवच मारतो, तुम्ही गावाकडे कसे येता असे म्हणून पिंपरगव्हाण रोड येथे राहणारे अशोक राऊतमारे यांना मारहाण करुन त्यांच्या घरावर दगडफेक केली या प्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कुर्ला येथील रहिवाशी अशोक राऊतमारे हे आपल्या कुटूंबियांसह काल दि.13 मे 2024 रोजी दुपारी आपल्या कुर्ला ता.जि.बीड या गावी मतदान करुन आले असता रात्री त्यांच्या घरावर दगड फेकल्याचा व खिडकीच्या काचा फुटल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी बाहेर येवून पाहिले असता त्यांना त्यांच्या गावातीलच अनिल पाटील, दादा सोनवणे, दादा यादव व अज्ञात दोघे यांनी शिवीगाळ करुन “तुम्ही कमळाला मतदान का केले? तुम्ही आता गावाकडे कुर्ल्याला कसे येतात?, तुमचा मुलगा आकाश कुठे आहे त्याला बोलवा तुम्हाला जिवच मारतो आणि आकाशला पण जिवच मारतो” असे म्हणून मारहाण केली त्यावेळी आजूबाजूचे व्यक्ती सोडवण्यासाठी आले म्हणून राऊतमारे कुटूंबियांना मारहाण न करता वरील लोक म्हणाले की आता लोक आले म्हणून तुम्ही वाचलात व घरावर दगड फेकून बाजूला राहणार्‍या संजय कुलकर्णी यांच्या अल्टो गाडीची तोडफोड केली. या प्रकरणी आरोपींवर 307 सह अन्य कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Leave a comment