ड्युटी म्हणून नाही तर सेवा म्हणून रुग्णांकडे पाहणार्‍या डॉ.थोरात यांचे निलंबन

केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात सर्वत्र संताप

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या कामावर अवघा जिल्हा खुश असतांना आ.नमिता मुंदडा यांनी लक्षवेधीद्वारे कोरोना काळातील औषध खरेदी व भरती प्रक्रियेचा विषय मांडला व यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ.अशोक थोरात यांचे निलंबन केले जाणार असल्याचे सांगितले मात्र यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व सामान्यांकडून डॉ.थोरातांचे निलंबन म्हणजे जातीय राजकारणाचा बळी ठरला असल्याची चर्चा सोशल मिडीयातून होत असून चांगले अधिकारी बीडमध्ये राजकारणी लोक टिकू देत नाहीत असा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात आज रोजी एक जिल्हा रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालये, 14 ग्रामीण रुग्णालय, 52 प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि 290 उपकेंद्र अशी रुग्णांसाठी आरोग्याची साखळी आहे याकडे बारकाईने लक्ष देत आणि तात्काळ तातडीने मदत देण्यास नेहमीच सर्वतोपरी प्रयत्नशील असणारे डॉ.अशोक थोरात हे आज राजकीय बळी ठरले आहेत. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत कोव्हीड-19 काळातील भ्रष्टाचाराची पोल खोल केली आहे. मात्र आमदार नमिता मुंदडा यांच्या या लक्षवेधीनंतर बीड जिल्ह्यात सोशल मिडीयावर तसेच बाजारपेठेत सर्वसामान्यातून आ.मुंदडा यांच्याबद्दल मांडलेला मुद्दा रास्त आहे परंतू डॉ.अशोक थोरात यांनी कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या वेळी बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची खबरदारी घेतली होती तसेच कोरोना झालेल्या रुग्णांना लवकरात लवकर बरे केले इतकेच काय तर सर्वसामान्यांच्या एका फोनवर डॉ.थोरात हे कर्मचार्‍यांना सहकार्य करण्यास सांगतात,तसेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आर्थिक परिस्थिती बिकट असणार्‍या रुग्णांची संख्या जास्त असते. या रुग्णांना वेळेत सेवा मिळावी यासाठी डॉ.अशोक थोरात यांनी जिल्हा रुग्णालयात चांगले प्रयत्न केले त्यांच्या या कामाचा फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना होत असतानाच राजकीय द्वेषातून डॉ.अशोक थोरात यांच्यावर कार्यवाी करण्यात आल्याची चर्चा आहे.
डॉ.थोरात यांनी पदाकडे ड्युटी म्हणून नाही तर सेवा म्हणून पाहिले आहे त्यामुळे आ.नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नी सखोल चौकशी होवून याची पाळेमुळे शोधून काढा कारण की एकटे डॉ. अशोक थोरात भ्रष्टाचार कसा करतील असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.तसेच डॉ.अशोक थोरात यांना पुन्हा रुजु करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a comment