
बीड । निवेदक
लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्याही प्रचारात सहभाग न घेता अलिप्त राहण्याचे धोरण सध्या तरी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेत्यांमधील मोठा चेहरा आणि बीडच्या राजकारणातील जयदत्त क्षीरसागर नामक हे बडे नेते असलेले व्यक्तीमत्व सध्या कोणत्याही व्यासपीठावर नसल्याने त्यांचे प्रचारापासून अलिप्तवादी धोरण कोणाच्या फायद्याचे ठरेल की जयदत्त क्षीरसागर आणखीनही काही भूमिका घेवू शकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जामंत्री, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तसेच 2019 शेवटी त्यांना शिवसेनेकडून (रोजगार हमीमंत्री) कॅबीनेटमंत्रीपद मिळाले होते.बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर हे मंत्री असतांना पक्ष वाढवण्यासाठी ताकदीने मेहनत घेतली. जिल्ह्यात सहा आमदार आहेत, त्यापैकी 5 आमदार निवडून आणले तसेच बीड नगर पालिका कित्येक वर्ष त्यांच्याच ताब्यात होती त्यामुळे जयदत्त क्षीरसागर ही बीडकरांसाठी किंवा जिल्हावासियांसाठी काही साधी आसामी नाही.
मराठवाड्यातील एक ओबीसी चेहरा तसेच देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते त्यावेळी 2014 साली राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे.
जयदत्त क्षीरसागर यांचे पुर्वीपासून बीडमधील तसेच राज्यातील राजकीय घराण्यांशी सलोख्याचे संबंध राहिललेे आहेत. तौलिक साहू महासभेमुळे पंतप्रधान मोदींशी संवाद आणि तसेच राज्यात देखील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत. यापुर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी भेट दिली होती. विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. आज जयदत्त क्षीरसागर हे प्रचारामध्ये कोठेही दिसत नाहीत म्हणजे अलिप्त आहेत परंतू त्यांचे अलिप्ततावादी धोरण हे ऐनवेळी कोणाला बळ देईल की नाही हे अजूनही स्पष्ट झालेेले नाही. जयदत्त क्षीरसागर यांनी 2019 निवडणुकीमध्ये डॉ.प्रितम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. आता या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर शेवटपर्यंत अलिप्तच राहतील की अचानक कोणाला पाठिंबा जाहीर करतील या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.