चित्रकला ड्रॉईंग ग्रेड परीक्षेची तयारी करताना  

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत कला संचालनालय ,मुंबई द्वारे शालेय स्तरावर अत्यंत महत्त्वाची चित्रकलेच्या परीक्षा इलेमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात .या परीक्षेद्वारे चित्रकलेच्या क्षेत्रात मोठे करिअर करण्याच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत .या परीक्षेचे महत्त्व वाढले असून डीएड, बीएड, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग च्या पूर्व परीक्षेत गुण वाढले जातात किंवा प्रवेशास प्राधान्यक्रम दिला जातो व प्रवेश प्रक्रिया सोपी होण्यास मदत होते.याबाबत पालकांमध्ये कमी प्रमाणात जागरूकता असल्याचे दिसून येते.या परीक्षेची सुरुवात 1880 पासून मुंबईतील लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट या चित्रकला संस्थेद्वारे कला शिक्षण तज्ञाच्या मार्गदर्शनाने या परीक्षेची सुरुवात झाली.या परीक्षेत महाराष्ट्र राज्यासह भारतातली कलाक्षेत्रात आवड असणारे इच्छुक विद्यार्थी  सहभागी होतात.पुर्वी कला संचालनायातर्फे या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु, 2024-25 पासून महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचा अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता शासकीय रेखाकला परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणार आहेत. शासनाने शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुनर्रचित अभ्यासक्रमास 16 फेब्रुवारी 2015 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.  त्यानुसार यंदाही ही शासकीय रेखाकला इंलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा दि.25 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान घेण्यास येणार आहे.
परीक्षेची जाहिरात जुलै महिन्यात येते व ही परीक्षा दर वर्षी सप्टेंबर महिन्यात घेतली जाते.इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दोन दिवसाच्या असून दररोज दोन पेपर असतात.म्हणजे प्रत्येक परीक्षेत एकूण चार पेपर असतात.या परीक्षेच्या तयारीसाठी ड्रॉइंग बोर्ड, एच. बी.पेन्सिल, 12 इंच पट्टी, पाण्यासाठी मग, रंग बनवण्यासाठी मग ,गोल ब्रश, रबर ,सुती कापड ,वॉटर कलर, पोस्टल कलर आवश्यक असतात.या परीक्षेत शालेय विद्यार्थ्यांना शक्यतो सातवीच्या पुढील वर्गात म्हणजे आठवी ते नववी ला  बसवतात याचे कारण म्हणजे चित्रकलेच्या परीक्षेत  भूमितीचा काही भाग असून मुलांना इयत्ता पाचवीच्या पुढील वर्गात हा अभ्यासक्रम झाल्याने चित्रकलेच्या इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा देण्यास सोपी जाते.विद्यार्थ्यांच्या अंगी खास चित्रकला गुण अवगत असतात रेषा, रंगछटा, प्रकाश, आकार, पोत यामधील सुसंवाद साधून केलेला अविष्कार यातून चित्र आकारास येते.इलेमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत चार विषय असतात .वस्तू चित्र, स्मरण चित्र, संकल्पचित्र व नक्षीकाम, कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन ,इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत चार विषय आहेत.स्थिरचित्र, स्मरण चित्र, संकल्पचित्र व नक्षीकाम ,कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन .एलिमेंट्री ग्रेड परीक्षेसाठी चार ते पाच वस्तू तर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी पाच ते सात वस्तूंच्या समूहाचे रेखाटन प्रमाणबद्ध करून छाया प्रकाशासह रंगकाम करावे लागते.बारकाव्याने रेखांकन करून पारदर्शक अथवा अपारदर्शक जल रंगात रंगवावे लागते.स्मरण चित्र – पेपरला शोभेल एवढे रेखाटन करून, फिगर तीन बाय चार घेऊन सुयोग्य रचना करून जल रंगात रंगकाम करावे लागते.संकल्पचित्र- विविध अलंकारिक ,भौमितिक आकाराचा उपयोग करून दिलेल्या विषयावर विविध रंगसंगतीतून हा संकल्प रंगावा लागतो. कर्तव्य भूमितीत- रेषा, रेषेचे भाग, कोन ,कोनाचे प्रकार, कोणाचे भाग, कंस, कंसाचे प्रकार, त्रिकोणाचे प्रकार, चौरसाचे प्रकार ,आयाताचे प्रकार, वर्तुळ, पंचकोन, षटकोन, सप्तकोन ,अष्टकोन, भूमितीतून कंपासाच्या साह्याने पूर्ण करावे लागतात. अक्षर लेखनात –  रेखीव अक्षर लेखनाला महत्व देऊन पूर्ण करावी लागते.या सर्व विषयाची तयारी चित्रकला क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनातून करावी लागते या वर्षीच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दिनांक 25 सप्टेंबर 2024 बुधवार रोजी विषय वस्तू चित्र परीक्षेची वेळ सकाळी 10.30 ते 1 (2. 30 तास ),स्मरण चित्र दुपारी 2.00 ते 4.00 (2.00 तास),गुरुवारी दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी संकल्प चित्र व नक्षीकाम सकाळी 10.30 ते 1.00( 2.30 तास ), कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन दुपारी 2.00 ते 4.00 ( 2.00 तास ),इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दिनांक 27 सप्टेंबर, 2024 वार शुक्रवार रोजी स्थिरचित्र परीक्षेची वेळ सकाळी 10.30 ते 1.30 ( 3.00 तास) स्मरण चित्र दुपारी 2.30 ते 4.30( 2.00 तास),दिनांक 28 सप्टेंबर 2023 वार शनिवार रोजी संकल्प चित्र व नक्षीकाम  सकाळी10.30 ते 1.30 ( 3.00 तास ),कर्तव्य भूमिती , घन भूमिती व अक्षर लेखन दुपारी 2.30 ते 5.30 ( 3.00 तास) असे दोन्ही परीक्षेचे एकूण चार दिवसाचे वेळापत्रक आहे.एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड या दोन परीक्षा  ग्रेड पद्धतीने पास झाल्यानंतर इयत्ता दहावीसाठी शिक्षण मंडळाकडून विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी सवलतीचे गुण देण्यात येतात.यात अनुक्रमे – ग्रेड साठी 7 गुण, इ ग्रेड साठी 5 गुण, उ ग्रेड साठी 3 गुण देण्यात येतात.अभियांत्रिकी पदवी व पदविकेसाठी प्राधान्य देण्यात येते व तसेच ज्यांना चित्रकला शिक्षक होण्याची आवड आहे त्यांना चित्रकला शिक्षक (एटीडी) प्रवेशासाठी एलिमेंट्री  ड्रॉइंग  ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.तसेच कलाक्षेत्रात रोजगाराच्या व करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.आर्किटेक्चर, इंटेरियर डिझाईन ,वेब डिझाईन ,आर्ट टीचर डिप्लोमा, ग्राफिक्स डिझाईनिंग, निमेशन ,चित्रकला प्राध्यापक, प्रोडक्ट डिझाईनिंग, जाहिरात मार्केटिंग, अप्लाइड, बी एफ ए, एम एफ ए ,गेमिंग, आर्टिस्ट, आर्ट डायरेक्टर उत्पादन क्षेत्रातील सर्व इंडस्ट्रीजमध्ये डिझाईन इंजिनिअर तसेच वस्त्रोद्योगामध्ये डिझाईनिंग कलाकार म्हणून संधी आहे तसेच यासह आदि क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. चित्रकला परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024पासून सुरु होणार असून इच्छुक विद्यार्थी, पालकांनी आपआपल्या शाळेतील चित्रकला शिक्षक / मुख्याध्यापकांशी संपर्क करावा अधिक माहितीसाठी हीींिीं://ुुु.ाीलरश.ेीस.ळप या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांनी केले आहे.
डॉ.संजय तांदळे ,करिअर कौन्सिलर, बीड.

Leave a comment