गरीबांची जीवनवाहिनी वाचलीच पाहिजे एस.टी. व्हेंटीलेटरवर

ज्या एसटीचा प्रवास मला लहानपणापासून आवडता आहे. तिचे राष्ट्रीय महामार्गावरील साम्राज्य, वेळेच्या वेळेला थांबा, कमी प्रवासी भेटले तरी आहे त्या गावावरुन पुढे सरकणे आणि वेळच्या वेळी पोंहोचणे. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे या एस.टी.प्रवासाचे मला लहानपणापासून आकर्षण राहिलेले आहे या एस.टी.बसमुळे अनेक गोड अनुभव पहावयास मिळाले. बर्‍याचशा पर्यटनस्थळांना भेट एस.टी.प्रवासांमुळेच झाली परंतू अलीकडेच या एस.टी.ने देखील वेगळाच अनुभव दिला तो असा की, गेल्या चार ते पाच दिवसांपुर्वी दोन दिवस (तसा दिडच दिवस) औरंगाबादला(छ.संभाजीनगर) खासगी कामासाठी गेलो होतो सकाळी 9.30 ला बीड बसस्थानकावर जावून विचारले की सुपर गाडी म्हणजे जी बीड-औरंगाबाद दोन तासातच पोंहोचते ती कधी सुटणार? त्यावर त्यांनी उत्तर दिले की त्या गाड्या बंद आहेत मी का अशी विचारणा केली असता तो कर्मचारी म्हणाला की त्या दिवसागणीक केवळ 5 गाड्या सुटत आहेत मी सहज मनात पुटपुटलो की इतकी दयनीय आणि भयानक अवस्था महामंडळाची कशी काय झाली? म्हणून मी दुसर्‍या गाडीत बसलो आणि औरंगाबाद प्रवास सुरु केला.

सोबत माझ्या एस.टी.महामंडळातील सरवदे नामक कर्मचारी बसला होता. तो एस.टी. कर्मचारी आहे हे त्याच्या ड्रेसवरुन कळले होते पुढे प्रवासात त्याला सांगितले की, 12 वाजेपर्यंत पोहोंचयाचे आहे गाडी तर 1.30 वाजेपर्यंत जाणारी भेटली कशामुळे सुपर गाडी बंद आहे तर त्याने एस.टी.ची सर्व कहाणी इत्यंभूत सांगितली “तो म्हणाला की काय सांगावं तुम्हाला लातूर ते औरंगाबाद या रस्त्यावर कालपासून 4 गाड्या बंद पडल्यात सर्व बसेस नवीन करण्याची वेळ आली आहे पहिल्या गाड्या मोडकळीस आल्या आहेत, मी सुद्धा तसाच अडकलो होतो काल, आमची गाडी लातूर रोडवर बंद पडली होती आम्ही एस.टी.महामंडळाने प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली परंतु केवळ करुयात असे आश्वासन दिले जाते”

हे सर्व ऐकल्यावर क्षणभर वाटले की, प्रत्येक प्रवाशाचा 1 रुपया जास्तीचा तिकीटामध्ये घेतला जातो. दररोज 65 लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात म्हणजे 65 लाख दररोज सरकारी तिजोरीत जास्तीचा पैसा जमा होतो. तसेच पहिल्या पेक्षा रस्त्यांची जास्त सुधारणा झालेली आहे त्यामुळे दळण वळण वाढले आहे पर्यायाने एस.टी. बसेस गावो-गावी सोडल्या गेल्या तर एस.टी.महामंडळ आणखीनही प्लस मध्ये येईल. आमच्या बीडमध्ये तर फार पुर्वी एस.टी.च सी.टी.बस म्हणून शहरातून ये-जा करायची ती 3-4 वेळा पेठबीड-माळीवेस-साठेचौक, बसस्टॅण्ड असा मार्ग असायचा परंतू एस.टी.खात्यातील भ्रष्टाचारामुळे या हे खाते दिवाळखोरीत निघाले असून एस.टी.च्या सर्व सुविधा महागल्या आणि आता तर ही गरीबांची जीवनवाहिनी शेवटचा श्वास मोजतेय अशी चुणूक पहायला मिळतेय त्यामुळे काही झाले तरी एस.टी.बसेस वाचलीच पाहिजे काय लिहावे बस्स इतकेच.

Leave a comment