एक बाबरी सब पर भारी

बीड । निलेश पुराणिक
2019 सालच्या 14 व्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात केवळ माजलगाव चा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी युवा नेतृत्व आमदार झाले ज्यामुळे त्या-त्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आता माजलगाव मतदारसंघात देखील बाबरी मुंडेसारखे नेतृत्व पाहिजे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर बाबरी मुंडेंना आमदार करण्यासाठी तरुणाई एकवटली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
बाबरी मुंडे हे नाव जिल्ह्यातील युवा नेतृत्वामध्ये अडचणीतील आधारासारखे आहे त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे म्हणजे वडवणीकरांसाठी सिस्टम सपोर्ट त्याबरोबरच बाबरी मुंडे यांनी पहिल्यापासूनच लोकांसाठी कुठलेही काम करण्याची तळमळ राजकारण, समाजकारण, सहकार लोकाचे प्रश्न कोणत्या पद्धतीने सहजा सहजी सोडविता येतील याचा अनुभव आणि स्व.मुंडे कुटूंबियांशी जवळीक यामुळे त्यांची माजलगाव मतदारसंघात मोठ्या जमेच्या बाजू आहेत तसेच कोरोना काळात एमर्जन्सी काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केलेल्या बाबरी मुंडेंना आम्ही कसे विसरु युवा वर्गातून अशी हाक निघत आहे तसेच वडवणी नगर पंचायतीच्या माध्यमातून व्यापारी संकुल, रस्त्यांचा प्रश्न सोडविल्यामुळे त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
त्यामुळे एक बाबरी सब पर भारी अशीच स्थिती युवा वर्गातून दिसून येत असून सोशल मिडीयावर बाबरी मुंडे यांच्या संवाद दौर्याचे ईमेजस तसेच भेटींना मिळत असलेल्या प्रतिसादाचे फोटो अपलोड करण्यात तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.