वंचित बहुजन आघाडीची अति तातडीची व महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे संपन्न
अंबाजोगाई
वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी बाळासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य वंचित चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आजची बैठक बीड जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले तसेच कोणत्याही क्षणी आचारसंहिता व निवडणुकांना सामोरे जावे लागेल त्यामुळे निवडणुकांना सामोरे जाण्यासाठीची रणनीती आपल्याकडे तयार असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बैठकीत केले.
पुढे बोलतांना शैलेश कांबळे म्हणाले की, सध्या नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशन संपताच महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. व महाराष्ट्रात निवडणुका कधीही होऊ शकतात त्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी रणनीती आपल्याकडे तयार असणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडी कशी सत्तेत येईल याविषयी सर्व पदाधिकार्यांनी गांभीर्याने दखल घेतली. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करू व वंचित बहुजन आघाडी सत्तेत आणू याकरिता या बैठकीत अनेक विषयावर चर्चा मार्गदर्शन व निवडणुकां संदर्भात सर्वांचे मत व उणीवा अशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपस्थित बीड जिल्हा पूर्व चे अध्यक्ष शैलेश कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे ,जिल्हा उपाध्यक्ष अमोल पौळे व जिल्हा उपाध्यक्ष सचिन उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष धम्मंद कासारे ,जेष्ट नेते चंद्रकांत खरात सर. जिल्हा कार्यकारणी जिल्हा महासचिव बिभीषण भाऊ चाटे , शहर आध्यक्ष गोविंदजी मस्के ,शहर महासचिव नितीन सरवदे , शहर प्रवक्ते उमेश शिंदे व शहर कार्यकारिणी तालुका कार्यकारणी तालुकाध्यक्ष खाजा मिया पठाण व तालुका कार्यकारणी, अण्णासाहेब देशमुख, अब्दुल भाई मौलाना, रशीद भाई, तसेच तृतीयपंथी प्रतिनिधी नंदिनीताई व त्यांचे सोबती महिला कार्यकारणी छायाताई हिरवे, शोभाताई जाधव ,सुचिताताई सोनवणे व विजयमाला जोगदंड तसेच केज कार्यकारणी ,धारूर कार्यकारणी, वडवणी कार्यकारणी, परळी कार्यकारणी असे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.