ज्ञानराधाच्या दारात लोकांची गर्दी
बीड । निवेदक
आज दि.05 मार्च 2024 रोजी ज्ञानराधा पतसंस्थेच्या सर्वच शाखेसमोर ग्राहकांची गर्दी झाली होती आणि शाखेच्या दारात 100 फुटाची रांग उभी होती.
काही लोकांशी चर्चा केली असता सकाळी 7 वाजल्यापासून घर सोडून ग्राहक पतसंस्थेच्या दारात उभी असल्याची माहिती मिळत होती.
गेल्या 4-5 महिन्यापुर्वी सुरेश ज्ञानोबा कुटे यांची ज्ञानराधा पतसंस्था बंद असल्याने तसेच या पतसंस्था सर्व पतसंस्थापेक्षा जास्त ठेवी असल्या कारणाने अनेक ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. अनेकांच्या घरी लग्न कार्य असल्याने त्यांनी पैशाची वाट पाहात कार्ये पुढे ढकलली आहेत, तर कुणाच्या घरी आजारी पेशंट असल्याने त्याचे देखील उपचार पैसे आल्यानंतर करु म्हणत पुढे ढकलली आहेत.
त्यामुळे कुटे साहेब लोकांनी विश्वास ठेवला, संयम बाळगला, तुम्ही देखील तारीख पे तारीख वाढवून दिल्या परंतू आता आज पासून पैसे देण्यास सुरुवात करा. ग्राहक सकाळपासून आपल्या दारात हक्काचे पैसे मिळण्यासाठी काही न खाता, चहा पाणी न पिता देखील दारात पैसे मिळतील या तळमळीने आपल्या दारात उभा आहे.