एकाच महिन्यात रेल्वे प्रवाशांकडून 20 कोटींचा दंड वसूल

नियमानेच प्रवास करा रेल्वे विभाग

छत्रपती संभाजीनगर । निवेदक
विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने डिसेंबर 2023 मध्ये 20.49 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली. त्यात हा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे.
विभागनिहाय उत्पन्न खालीलप्रमाणे आहे : मुंबई विभाग रु. 7.33 कोटी, भुसावळ विभाग रु. 4.54 कोटी, नागपूर विभाग रु. 2.94 कोटी, सोलापूर विभाग रु. 2.58 कोटी, पुणे विभाग रु. 1.56 कोटी आणि मुख्यालय रु. 1.52 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे त्यामुळे अनियमित प्रवास आणि विनातिकीट प्रवास करु नये नियमानेच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a comment