उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा हादराअनिल जगताप हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार 9 तारखेला मुंबईत होणार पक्षप्रवेश


बीड/ निवेदक
अनेक वर्ष शिवसैनिक त्यानंतर उपजिल्हाप्रमुख त्यानंतर जिल्हाप्रमुख तसेच विधानसभा चे उमेदवार राहिलेले अनिल जगताप यांनी आज अखेर शहरातील नीलकमल हॉटेल येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट सोडत असून येत्या ९ जानेवारीला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
पुढे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल जगताप म्हणाले की आयुष्यभर मातोश्री वर श्रद्धा ठेवली याचे फळ पक्षाने कुठलीही माहिती न देता पदावरून काढले व विधानसभा निवडणूक आली की असा अन्याय होतो. तरीदेखील बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा आणि उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात संकटात आहेत म्हणून मी शिवसेनेतच राहिलो. परंतु कसलीही कल्पना न देता कायम मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखवण्यासाठी मला पदावरून काढले, सुषमा अंधारे आणि बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी पैसे घेऊन शिवसेनेची पद विकली, अंधारे यांना अंधार करावयाचा असून त्यांच्यामुळे शिवसेनेचे किती नुकसान होते ते येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना कळेल असे अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.
आजवर प्रामाणिकपणे बाळासाहेबांचे विचार बीड तालुक्यात आणि जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवले शिवसेनेचा भगवा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गाव वस्ती वाडी तांडा फडकवला. अठरापगड जाती धर्मातील लोकांची नावे शिवसेनेची जोडली याचबरोबर बीड जिल्ह्यात सर्वत्र चळवळीने पक्षाचे काम करणारे शिवसैनिक उभा केले त्यांना हाताशी घेऊन जिल्हा भरात पक्ष बांधणी केली मतदारांची संख्या वाढवली. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक जास्त सदस्य नोंदणी देणारा जिल्हा म्हणून बीड अशी देखील स्तुती उद्धव ठाकरे यांनी केली होती याचा सर्वांना विसर पडला असावा. पडत्या काळात सेनेत राहून शिवसेनेची ताकद राखून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका मी घेतली होती तसेच महाप्रबोधन यात्रा सभेदरम्यान देखील कॉर्नर बैठकांचे आयोजन केले होते, लोक संपर्क वाढवला होता याची किंचित देखील दखल कोणी घेतली नाही याउलट या सर्वांची फलश्रुती म्हणजेच मला निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर माझं पद काढून घेत माझ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचारावर मी चालत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 9 जानेवारी रोजी प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a comment