जंतर मंतर मैदानावरील देशव्यापी आक्रोश आंदोलनाला दिली भेट
बीड । निवेदक
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे झालेल्या सेवानिवृत्त ईपीएस-95 राष्ट्रीय समन्वय समिती नवी दिल्लीच्या वतीने आयोजित पेन्शन धारकांच्या देशव्यापी आक्रोश आंदोलनाला खा.सुप्रिया सुळे यांनी भेट मंगळवार दि.12 डिसेंबर 2023 रोजी दिली त्यावेळी त्यांनी निवृत्ती वेतन धारकाच्या कुचंबनेला वाचा फोडली व ईपीएस-95 पेन्शन धारकांच्या मागण्या पुर्ण करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तसेच पुढे बोलतांना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या (शरद पवार गट) येणार्या लोकसभा निवडणुकीच्या वचननाम्यात ईपीएस-95 पेन्शन धारकांच्या मागणीचा विचार करुन ई-पीएस-95 हिशोब व्यवस्थित करण्यात येईल तसेच लाभार्थ्यांच्या निधनानंतर पत्नी किंवा पतीला पेन्शन मिळावी, सरकारकडील त्यांचा पैसा जीवनावश्यक खर्चाच्या निर्देशांकानुसार पेन्शन स्वरुपात मिळावा असे पुढे सांगितले. तसेच सर्व लाभार्थ्यांना सरासरी 1500 रुपये पेन्शन मिळत असून 18 लाख लाभार्थ्यांना तर 1 हजार रुपयापेक्षाही कमी पेन्शन मिळते या वास्तव्याकडे खा.सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले या मेळाव्यास निवृत्त कर्मचारी ईपीएस-95 राष्ट्रीय समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे, राष्ट्रीय सचिव प्रकाश पाठक, बाबुराव दळवी, पुंडलिक पांडे, भिमराव डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठवाड्यातील विभागीय अध्यक्ष पी.पी.देशमुख, उपाध्यक्ष प्रभाकर मोहरील, संघटक डॉ.संजय तांदळे, मुंडलीक, डी.के.पाटील, श्री.दिक्षीत, श्री.मंडलीक, सर्जेराव दहिफळे, सुभाष कुलकर्णी, बाबुराव दळवी, अंकुशराव पवार, विठ्ठलराव पावसे, विलास विसपुते आदींसह बहुसंख्येने ईपीएस -95 पेन्शन धारकांची उपस्थिती होती.