बीड । निवेदक
येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीतर्फे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेला आष्टी-पाटोदा-शिरुरच्या विधानसभेतून आस्मान जरांगे पाटील निवडणुक लढवणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष विष्णुपंत गिरी, दहिवंडीचे सर्कलप्रमुख नारायण आघाव, दहिवंडीचे शाखा प्रमुख संजय आघाव, कोळवाडीचे शाखाप्रमुख अंबु जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी कामे पाहता देशामध्ये आम आदमी पार्टीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून आम आदमी पार्टी हा पक्ष भ्रष्टाचारमुक्त राजकारण करत आहे त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा अल्पावधीतच प्राप्त झाला आहे. अशातच महाराष्ट्र राज्यात राजकारणात बावळटगिरी, आमदार-खासदार विकत घेणे, पक्षफोडीची वृत्ती विकास कामात टक्केवारी खाणे यामुळे महाराष्ट्रातील राजकारण कीडयुक्त झाले आहे. त्यामुळे लागलेली कीड संपुष्टात आणण्यासाठी व शेतकर्यांचे, सुशिक्षित बेकारांचे, महीलांचे, कंत्राटी नौकर वर्गीयांचे कामे करण्यासाठी आम आदमी पार्टी राज्यातील सर्व 288 विधानसभा लढवणार आहे असेही पत्रकाद्वारे आम आदमी पार्टीकडून कळविण्यात आले आहे.