बीड । निवेदक
डिजीटल युगात सर्वांच्या हाती स्मार्टफोन आल्याने प्रचार करण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी आता प्रचारही ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे. लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीत 18 वी लोकसभा ही प्रत्यक्ष भेटून, कार्यकर्त्यांशी संवाद साधून आज पासून पंकजाताईंनी सुरु आहे खरी परंतू त्यांचे कार्यकर्ते किंवा मुंडेप्रेमी हे या अगोदरच सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार करतांना दिसून येत आहेत पंकजाताई मुंडे खासदार झाल्या तरी बीड जिल्ह्याचेच हीत आहे असे म्हणून सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांचा अनोखा प्रचारच सुरु केला आहे त्यामुळे यंदाची निवडणुक सोशल मिडीयावर देखील रंगणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पुर्वी कार्यकर्त्यांचा लवाजमा घेवून तसेच असंख्य नागरिकांच्या गर्दीत उन्हामध्ये प्रचार सुरु होत होते आता मात्र गेल्या 10 वर्षापुर्वीची लोकसभा आणि आजची लोकसभा दोन्ही लोकसभेच्या प्रचाराच्या पद्धतीमध्ये बरेचसे वेगळेपण दिसून येत आहे. प्रचार, संपर्क, नव-नवीन चारचाकी गाड्या या सर्वांचेच वेगळेपण आकर्षित ठरले आहे. गेल्या 10 वर्षापुर्वी सनरुफ मधून प्रचार होत नव्हता तर तो प्रचार साध्या वाहनाने होत होता. आता सनरुफमधून उमेदवार प्रचार करत आहेत. जे.सी.बी.तून फुलाद्वारे स्वागत, प्रचारादरम्यान वापरले जाणारे वायरलेस माईक यामुळे तसेच सोशल मिडीयातून व्हाट्स स्टेटस ठेवले जाणारे पंकजाताईंचे भाषणादरम्यानचे व्हिडीओ, पंकजाताई काय बोलल्या त्याबाबतची फेसबुक पोस्ट, इन्स्टॉग्रामवरील पोस्ट अशा सोशल मिडीयावरील पहायला मिळत आहेत.
याशिवाय आपल्या उमेदवाराचा सारखा-सारखा स्टेटसला फोटो ठेवणे, व्हाट्स प्रोफाईल देखील आपल्याच उमेदवाराची ठेवणे, व्हाट्स अप ग्रुप बनवणे अशा अनोख्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. नेटकरी मात्र वेगवेगळे डायलॉग्स, गमतीशीर कंमेट्स वाचण्यात व्यस्त आहेत. या सर्व प्रचाराकडे आणि आरोप-प्रत्यारोपाकडे प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.