बीड (प्रतिनिधी)- आरक्षण बचाव यात्रा ही चैत्यभूमी दादर येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. तरी त्यांची महासभा 30 जुलै आज मंगळवार रोजी अंबाजोगाई येथे होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे लिंबराज गायकवाड.लक्ष्मण ओव्हाळ. समाधान बचुटे.गणेश जानराव मनोज सोनवणे.विठ्ठल आनेराव. प्रमोद शिंदे.सचिन गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एससी, एसटी, ओबीसी यांच्या आरक्षणाचा लढा अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहेत एसी एसटी ओबीसीचे आरक्षण कायम रहावे व मराठा समाजासाठी आरक्षणाचे वेगळे ताठ असावे ही कायम भुमिका अॅड. बाळासाहेब आंबेडकर मांडत आहेत. गेली कित्येक वर्षांपासून आपली राजकीय पोळी साधण्यासाठी सत्ताधारी व विरोधक ओबीसी व मराठा बांधवांमध्ये दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मराठा समाज व ओबीसी समाज संघर्ष टोकाला गेला आणि अशातच महाराष्ट्र राज्यात अशांतता निर्माण होवू नये म्हणून कायम सातत्याने भुमिका घेत आहेत म्हणून एसी, एसटी, ओबीसी व मराठा बांधवांमध्ये जनजागृती होण्यासाठी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एसी, एसटी,ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रातुन सुरू केली आहे यात्रे निमित्त अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आरक्षण बचाव यात्रा अंबाजोगाई, जिल्हा बीड येथे येत आहे. त्या निमित्ताने महासभेचे आयोजन अंबाजोगाई शहरात 30 जुलै रोजी.सकाळी ठिक 11:30 वाजता.करण्यात आले असून ऐतिहासिक आरक्षण बचाव महासभेस केज विधानसभा मतदारसंघातील एसी, एसटी, ओबीसी बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले आहे.