
बीड । निवेदक
जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आज होणार्या अॅड.प्रकाश आंबेडकरांच्या सभेमुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा विजय निश्चित आहे असा आवाज वंचित बहुजन आघाडीमधून ऐकावयास भेटत आहे. अॅड.प्रकाश आंबेडकरांच्या आज होणार्या सभेमुळे अशोक हिंगेच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे अशी चर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत होत असून वंचित बहुजन आघाडी व त्यांचे पदाधिकारी बीड जिल्हा मतदारसंघावर आपली पकड मजबुत करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्याच्या राजकारणावर मजबुत पकड ठेवणारी वंचित बहुजन आघाडी दिवसेंदिवस आपला पक्ष मजबुत करत आहे मग दुसरीकडे राज्यात फोडाफोडीचे राजकारण असो अथवा सत्ताबदलाचे राजकारण असो याचा बीड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीवर कुठलाही परिणाम झाला नाही. वंचित बहुजन आघाडी बीडमध्ये पहिल्यापासून एकजूट राहिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी गेल्यावेळेस त्यांच्याविरुद्ध मोठे आव्हान असतांना देखील ‘लक्षा’ कडे वाटचाल केली होती.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा प्रचार सर्वात आघाडीवर असून आज अंबेजोगाई येथे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आज होत आहे आंबेडकर यांच्या सभेने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या विजयावर शिक्का मोर्तब होणार आहे असा सूर कार्यकर्त्यांतून ऐकावयास मिळत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचाराने बीड जिल्यात चांगलीच आघाडी घेतली असून गावा गावात निवडून येणार गॅस सिलेंडर बाकी होणार सरेंडर अशा घोषणा गावा गावातील कार्यकर्ते देताना दिसत आहेत तर गेली तीन दिवसा पासून प्रत्येक गाव, तांडा, वस्ती वर जाऊन प्रचार करत करत आज होणार्या सभेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण देत आहेत त्या मुळे प्रत्येक गावात एकच चर्चा मराठा, दलित, मुस्लिम वंजारी, बंजारा धनगर साळी, माळी ,कोळी सर्व जातीच्या आरक्षण साठी खंबीर पने पाठीशी उभे असलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करायचे असे मतदार बोलू लागले आहेत तर आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची अंबाजोगाई येथे सभा होणार असून मतदारात एक नवचैतन्यनिर्माण होऊन वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या विजयावर शिक्का मोर्तब होणार आहे असा आवाज कार्यकर्त्यांतून ऐकावयास मिळत आहे.
अॅड.प्रकाश आंबेडकर यांची आजची सभा म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणारा आणि प्रेरणादायी ठरणारी असेल.