अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ बुधवारी अ‍ॅड.आंबेडकर यांची बीड येथे सभा

बीड । निवेदक
वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि. 08 मे 2024 बीड शहरात सायंकाळी पाच वाजता प्रचार सभा होत आहे. या बैठकीमध्ये गाव, तांडा, वाडी वस्ती मधील जास्तीत जास्त मतदार सभेला कशा पद्धतीने उपस्थित राहतील यासाठी नियोजन सुरू आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारी ही सभा घेण्यात येईल असा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ गावागावांमध्ये मोठी यंत्रणा उभारण्यात आली असून प्रचार रथ, बॅनर यासह पथनाट्य कलापथक अशोक हिंगे पाटील यांच्या विजयासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. मतदार तिथे वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी उभारण्यात आला असून गेल्या आठ दिवसांपासून अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपूर्ण बीड जिल्हा पिंजून काढत आहेत. गेल्या शुक्रवार दि. 3 मे रोजी अंबाजोगाई शहरात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची रेकॉर्ड ब्रेक सभा संपन्न झाली असून अशोक हिंगे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता येत्या बुधवार दि. 8 मे 2024 रोजी बीड शहरामध्ये प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार असून या सभेमुळे अशोक हिंगे पाटील यांचा विजय निवडणुकीपूर्वीच निश्चित होणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.
बीड शहरात होत असलेल्या या जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. रेकॉर्ड ब्रेक होणार्‍या या सभेसाठी बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे.

संविधान बदलण्याचे व आरक्षण घालवण्याचे षडयंत्र हाणून
पाडण्यासाठी अ‍ॅड.आंबेडकरांच्या सभेला उपस्थित राहा-गायकवाड
वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारासाठी बुधवार 8 मे 2024 रोजी होणार्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी लिंबराज गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केले आहे.पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्व जाती धर्मांना सोबत घेवून चालणारे व्यक्तीमत्व अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी संविधान व आरक्षण वाचवण्यासाठी लोकसभेची ही निवडणुक संपुर्ण ताकदीने लढवत आहेत, तसेच बीड लोकसभा मतदारसंघाने नेहमीच धक्कादायक निकाल दिले आहेत याचा इतिहास आहे. येथे सर्व जातीचे लोक आणि सर्व पक्षांचे लोक आतापर्यंत खासदार झाले. मात्र अलीकडच्या काळात एकाच घराचा व्यक्ती खासदार होत आहे ज्यांनी आजपर्यंतचे मुलभूत प्रश्न, रेल्वेचा प्रश्न, कष्टकर्यांचा प्रश्न, शेतकर्यांचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, एम.आय.डी.सीचा प्रश्न जैसे थे ठेवले व आता भावनिक राजकारण करत आहेत त्यामुळे संविधान वाचवण्याची व आरक्षण वाचवण्याची जबाबदारी आता वंचितच्या सामान्य कार्यकर्त्यांवर आहे त्यामुळे गेल्या 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 92 हजार इतके मतदान घेवून लाखाकडे वाटचाल केली होती मात्र आता यावेळी संविधान बदलण्याचे व आरक्षण घालवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी व सर्वसामान्य उपेक्षित तरुणांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी म्हणूनच बुधवार 8 मे 2024 रोजी होणार्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन –लिंबराज गायकवाड यांच्यासह समाधान बचुटे.युवक जिल्हासचिव लक्ष्मण ओव्हाळ. अमित बचुटे.सचिन गायकवाड.मनोज सोनवणे. आकाश कोकाटे.वैभव कसबे.यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a comment