अमुक अमुक रक्कम डेबिटेडकशामुळे होतेय ऑनलाइन फसवणूक?

वाचा अग्रलेख

कष्टाने कमविलेल्या पैशाची कोणातरी त्रयस्थ व्यक्तीकडून कॉल करुन फसवणूक झाली आहे त्यानंतर आता पोलीस निरीक्षक स्थानिक ठाणे त्यानंतर कलम 420 द्वारे तक्रार दाखल झाली तर कारवाई अन्यथा पोलीस केवळ तक्रार ठेवून घेतात. मुळात पैसा कधीच कुणाला विनासायास मिळत नाही, त्यासाठी काहीना काही कष्ट करावेच लागतात असा कष्टाने कमावलेला, घामाच्या धारा वाहून मिळवलेला पैसा आपण बँकेत ठेवतो, एका फ्रॉड कॉलनंतर तो आपल्या बँक अकाऊंटमधून अचानक गायब होतो तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात, तुळतुळ वाटते, मानसिक त्रास होतो, पण थोडा सावधपणा दाखवला तर ऑनलाईन फ्रॉड करणार्‍या लोकांनाही आपण मामा बनवू शकतो आणि मनाला त्रास देखील होणार नाही याची दक्षता घेवू शकतो यासाठी खेळ असेल तो बुद्धिचातुर्याचा.
जेव्हा आपल्याला एक फोनकॉल येतो तेव्हा तो वेगळ्या नंबरवरून येतो आणि त्या फोनवर कधी घाबरवले जाते, कधी धमकी दिली जाते, कधी व्यावसायिक भाषेत विचारले जाते. तुमच्या एटीएमची मुदत संपली आहे तुमचा एटीएम काही वेळात बंद होईल. असा आपल्याला कॉल येतो. एटीएम हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याने आपण जास्त विचार न करता कॉल केलेल्या व्यक्तीला सगळे बँक डिटेल्स, सगळी माहिती पटापट सांगून टाकतो आणि वरती धन्यवादही म्हणतो आणि थोड्या वेळातच आपल्या फोनवर अमुक अमुक रक्कम डेबिटेड असा मेसेज येतो. तेव्हा आपल्याला समजते आपण फसलो. आपण फसलो असल्याने आपण त्याबाबत नातेवाईक, मित्रपरिवार यांना काहीच सांगत नाही. ही फसवणूक फक्त गरीब, अशिक्षित, शेतकरी यांची होते असे नाही तर यामध्ये उच्चशिक्षित, डॉक्टर, वकील यांचा अधिक समावेश आहे.आपली फसवणूक होण्याची असंख्य कारणे म्हणजे घाईगडबडीत फोन उचलून समोरची व्यक्ती कोण बोलते याकडे लक्ष न देता त्याला पाहिजे ती माहिती देणे., अनोळखी व्यक्तीला नाही कसे म्हणू, त्याला काय वाटेल अशी वाटणारी खंत, बँकेतून फोन केला आहे असे वाटणे.,बँक कधीही अशा प्रकारची खातेदाराची माहिती घेत नाही हे माहिती नसणे.,आपल्याला आधी हे समजून घ्यावे लागेल की, बँक किंवा कस्टमर केअरलाही खातेदारांना फोन करून खातेदाराची बँक डिटेल मागविण्याचा अधिकार नाही. समजा तुमच्या एटीएमची मुदत संपणार असेल तर त्यावेळी आधीच बँकेतून तुम्हाला पत्र किंवा मेल केला जातो. त्यानंतर खातेदारांनी बँकेत जाऊन त्यासंदर्भात माहिती घ्यायची असते; परंतु फोनवर अशा प्रकारे कुठलीही माहिती बँक घेत नाही. आता आपण फसगत होऊ नये काय करु शकतो. अनोळखी व्यक्तीने बँक डिटेल्स विचारल्यास त्याला माहिती देऊ नका, परत परत फोन आल्यास पोलिसात तक्रार करावी.,अनोळखी व्यक्तीने पाठवलेली मोबाइल लिंक ओपन करू नका त्या लगेच डिलिट करा., बँकेचे खाते, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जपून ठेवा त्यांचा ओटीपी नंबर सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवू नका. लॉटरी, बक्षीस, लागल्याचे ई-मेल, कॉल, मेसेज आल्यास त्याला बळी पडू नका, एटीएम सेंटरमध्ये छुपा कॅमेरा बसवला नाही ना याची खात्री करा.,एटीएमचा पीन क्रमांक टाकताना कोणासही दिसणार नाही, याची काळजी घ्या, एटीएममधून पैसे निघाले नाही तर त्वरित बँकेस कळवा. क्रेडिट कार्ड व बँक स्टेटमेंट यांची नेहमी पडताळणी करा. एटीएम कार्डद्वारे फसवणूक झाल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधून कार्ड बंद करून सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधा.कारण ती लॉटरी किंवा बक्षीस हे तुम्हाला नसून तुम्ही माहिती दिल्यास कॉल करणार्‍याला नक्की लागणारी असते. हे लक्षात ठेवा. खातेदारांची केवळ फ्रॉड कॉलद्वारेच फसवणूक होते असे नाही. खातेदारांची अनेक मार्गाने पिळवणूक सुरूच आहे. ऑनलाइन हॅकर नावाची जमात तर पाचवीला पूजलेली आहेच. ह्या जमातीचे एक बरे आहे ते सर्वसामान्य ग्राहकांना डायरेक्ट त्रास देत नाही, ते बँकेला लुबाडतात आणि ह्यांची फसवणूक लाखोत नसते करोडोत असते. मात्र, शेवटी अप्रत्यक्षरीत्या त्याचा बोजाही सर्वसामान्य ग्राहकांवर येतोच. फ्रॉड कॉल, बँक कर्मचार्‍यांची फसवणूक, बँक बंद पडणे, ऑनलाइन हॅकर्स ह्यांनी कितीही फसवणूक केली तरी त्यांना ह्या गुन्ह्याबद्दल शिक्षा काहीच नाही. आतापर्यंत कुठल्या फ्रॉड कॉलवाल्याला पकडून शिक्षा दिली आहे, कुठला हॅकर पोलीस यंत्रणेच्या हाती लागला आहे, कोणीच नाही. खातेदारांचे मात्र पैसे पुन्हा मिळत नाही. या व्यवस्थांचा थोडा का होईना मागोवा घेतला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे तरच टिकाव लागेल नाहीतर कष्टाने कमावलेला पैसा हा असाच आपल्यापेक्षा सावध चतुर माणसांच्या, व्यवस्थेच्या हातात जात राहील.

Leave a comment