अनिल जगताप यांची विधानसभेची तयारी ; गावदौरे-भेटीगाठी सुरू

बीडमध्ये 15 वर्षानंतर शिवसेनेचा आमदार करण्याचा चमत्कार जनता करेल का? सर्वांचेच लक्ष

बीड (वृत्तसंस्था)- बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी शहरात तसेच ग्रामीण भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माता भगिनींसाठी राबवलेल्या योजना, तसेच यापुर्वी अनिल जगताप यांनी केलेल्या सामाजिक कामाचा वस्तुपाठ मांडत जनतेमध्ये जावून अनिल जगताप बीड विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.तालुक्यातील खेड्या-पाड्यात जाऊन मतदारांसोबत चर्चा करत आहेत. ‘निवडणुकीला उभा राहणार आहे, असे अनिल जगताप यांनी यापुर्वीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले त्यामुळे अनिल जगताप हे निवडणुक लढवतील हे आता फिक्स आहे. धक्कादायक निकाल देत असलेला मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ या मतदारसंघातून अनेक नवखे उमेदवार आमदार झाले हे बीडकरांनी दाखवून दिलेले आहे. गेल्या 34 वर्षाच्या काळात शिवसेनेने बीड विधानसभा मतदारसंघ एकूण 03 वेळा जिंकला असून बीडमधील मुस्लीम मतदारदेखील अनिल जगताप यांच्या बाजूने असल्याचे पहायला मिळत आहे.अलीकडच्या राजकारणात जातीचा फॅक्टर हा विकासकामापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरत आहे. एकाच समाजातील दोन किंवा दोनपेक्षा जादा उमेदवार रिंगणात उभे राहिल्यास याचा फायदा हा नेहमीच विरोधी गटाला, पक्षाला झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतू मतविभाजन होणार नाही याची काळजी जर कणखरपणाने घेता आली तर चमत्कार होवू शकतो असे यापुर्वीच्या निवडणुकीत बीड मध्येच झाले आहे याचीच पुनरावृत्ती अनिल जगताप यांच्या रुपाने होईल का ? की जनता काय निर्णय घेईल याकडे मात्र आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a comment